"बॅफ'चे 400 विद्यार्थी आंदोलनाच्या तयारीत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

मुंबई -  मुंबई विद्यापीठाच्या निकाली गोंधळाचा फटका बीएस्सी इन अकाऊंट ऍण्ड फायनान्स (बॅफ)च्या विद्यार्थ्यांनाही बसला आहे. त्यामुळे "बॅफ'चे तब्बल 400 विद्यार्थी पुढील आठवड्यात मुंबई विद्यापीठाच्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. 

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात "बॅफ'ची सत्र 5 ची परीक्षा झाली होती. अद्यापही या परीक्षेचा निकाल लागलेला नाही. परिणामी मुंबई विद्यापीठाची 19 एप्रिलपासून सुरू होणारी "बॅफ'ची सत्र-6 ची परीक्षा मे महिन्यात घेण्यात येणार आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्या बुडणार असल्याने "बॅफ'चे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. मंगळवारी सत्र-5 ची एटीकेटी परीक्षा होती; परंतु अद्यापही निकालच जाहीर न झाल्याने ही परीक्षाही झाली नाही. त्यामुळे संतप्त होत विद्यार्थ्यांनी हिवाळी परीक्षांचा निकाल त्वरित जाहीर करावा; तसेच हा गोंधळ थांबवा, अशी मागणी केली आहे. त्यासाठी पुढील आठवड्यात मुंबई विद्यापीठावर शांततामय मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. 

उडवा-उडवीची उत्तरे 
या सगळ्या प्रकारांबाबत काही विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागात विचारपूस केल्यावर तेथील अधिकाऱ्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. हा प्रकार विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करीत ही ध्वनिफीत सोशल नेटवर्किंग साईटवर टाकली.

Web Title: BAF400 students organized the agitation