बविआ पालघर, बोईसर विधानसभा लढवणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

सफाळे ः बहुजन विकास आघाडी पालघर आणि बोईसर विधानसभा जागेवर उमेदवार उभे करणार आहे. या दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी येथील मेळाव्यात केले. 

सफाळे ः बहुजन विकास आघाडी पालघर आणि बोईसर विधानसभा जागेवर उमेदवार उभे करणार आहे. या दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी येथील मेळाव्यात केले. 

सध्या भाजप, शिवसेनेत सुरू असलेल्या इनकमिंगला उत्तर देण्यासाठी बहुजन विकास आघाडीतर्फे सफाळ्यातील देवभूमी सभागृहात शनिवारी (ता.१४) कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या वेळी वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. 

मेळाव्यास माजी राज्यमंत्री मनीषा निमकर, प्रवीण राऊत, तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, दामोदर पाटील, परशुराम चावरे, पी. टी. पाटील, विष्णू कडव, सरचिटणीस अनिश शेख, युवा अध्यक्ष डहाणू पारस जाधव, जीवन सांबरे आदी उपस्थित होते.

मेळाव्यात बविआमध्ये दोनदा आमदारकी घेतलेल्या विलास तरे यांनी शिवसेनेत उडी मारल्याने त्यांच्यावर टीका करण्यात आली. प्रवीण राऊत, पी. टी. पाटील यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी कामाला लागण्यास सांगितले. तसेच पालघर आणि बोईसर या दोन्ही जागा जिंकण्याचा विश्‍वास व्यक्त केला. बविआ स्वतः जागा लढवणार असल्याने कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्याचा प्रश्‍नच नसल्याचे प्रभाकर पाटील यांनी सांगितले.

बोईसरसाठी नव्या उमेदवाराचा शोध?
मनीषा निमकर यांनी कडक शब्दांत विलास तरे यांचा समाचार घेतला; मात्र त्या जागी बोईसर विधानसभा मतदारसंघात कोणाची वर्णी लागणार याबाबत लवकरच हितेंद्र ठाकूर निर्णय घेतील, असे जाहीर यावेळी  करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bahujan Vikas Aaghadi Party will contest the Palghar, Boisar Assembly elections.