बोगस मतदारांना तुरुगांची हवा!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

विरार ः विधानसभा निवडणुकीत बोगस मतदान होण्याची शक्‍यता लक्षात घेता आमदार हितेंद्र ठाकूर आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते राजीव पाटील यांनी या संदर्भात ॲक्‍शन प्लान तयार केला आहे. त्यानुसार निवडणुकीत बोगस मतदान करणाऱ्यांवर बविआच्या कार्यकर्त्यांचे लक्ष असणार आहे. 

मतदार यादीत आढळून येणारे बोगस मतदार आता निवडणूक अधिकारी आणि पोलिसांच्या रडारवर आहेत. बविआचे नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी बोगस मतदारांवरील कारवाईत त्यांना मदत करणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत बोगस मतदारांना मतदान करू दिले जाणार नाही. जे असा प्रयत्न करतील, ते सरळ तुरुंगात जातील, असा इशारा बविआतर्फे मंगळवारी (ता.२४) देण्यात आला. 

तुळिंज येथे माजी महापौर पाटील यांनी या कामाविषयी नालासोपारा पूर्वेकडील नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत बोईसर मतदारसंघातील काही भागात मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झाले. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे अनेक तक्रारी आल्या आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

माजी उपमहापौर उमेश नाईक यांनीही कार्यकर्ते व नगरसेवकांना मार्गदर्शन केले. कोणत्याही सुज्ञ मतदाराने उमेदवारांना आनंदाने मत द्यावे. बोगस मतदान करू नये, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bahujan vikas aaghadi will keep watch on bogus voters in Palghar near Mumabai