थोर व्यक्तींच्या यादीत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा सामावेश

तुषार सोनवणे
Friday, 15 January 2021

राज्य सरकारने जाहीर केलेल्या थोर व्यक्तींच्या यादीत आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव नमूद करण्यात आलं आहे. 

मुंबई - राज्य सरकारने जाहीर केलेल्या थोर व्यक्तींच्या यादीत आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव नमूद करण्यात आलं आहे. 

No photo description available.

2021 या नवीन वर्षात राष्ट्रपुरूष आणि थोर व्यक्तींची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबतचे अधिकृत परिपत्रक काढण्यात आले. हे परिपत्रक 15 डिसेंबर रोजी काढण्यात आले होते. या यादीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा सामावेश करण्यात आला आहे. 

No photo description available.

Balasaheb Thackerays name included in the list of great personalities of the state

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

-----------------------------------------------

Bird Flu Alert : नागरिकांनी मृत पक्षांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करु नये

 मुंबईसह राज्यात कुठेही बर्ड फ्लू किंवा इतर कारणाने मृत पक्षी  आढळून आल्यास त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी टोल फ्री दूरध्वनी क्रमांक जारी करण्यात आला आहे. टोल फ्री दूरध्वनी क्रमांक 18002330418 या क्रमांकावर त्वरीत संपर्क करा असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी केले आहे. राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणारे पक्षी मृत आढळून आल्यास किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्ममधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृत पक्षी निदर्शनास आल्यास, तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये याची माहिती दयावी.

-----------------------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balasaheb Thackerays name included in the list of great personalities of the state