
Balasaheb Thorat: "पुन्हा आमचं सरकार येईल!" थोरातांनी सांगितला आमदारांचा आकडा
मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षावर सध्या सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. यापार्श्वभूमीवर पुन्हा आपलं सरकार येईल, असा दावा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत त्यांनी आपली भूमिका मांडली. (Balasaheb Thorat our government will come again Balasaheb Thorat claim in MVA meeting)
"आपण एकत्र राहिलो तर विधानसभेत १८० आमदार निवडून येतील. सगळे एकत्र राहिलो तर त्याचा त्रास होईल, पण समनव्य साधला सगळ्यांना सांभाळून घेतलं तर आपलं सरकार येईल," असं थोरात मविआच्या नेत्यांना उद्देशून म्हणाले.
हे ही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?
दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांची दुपारी बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.