आधी आघाडीची चर्चा होईल; मग शिवसेनेचा विचार करू : बाळासाहेब थोरात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

'आधी राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये चर्चा होईल, मग शिवसेनेचा विचार करू. आमच्या बैठकीत ज्या गोष्टी ठरतील त्यानंतर शिवसेनेबाबत निर्णय घेऊ.' असे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज काँग्रेस नेत्यांच्या बैठकीनंतर दिले.

मुंबई : 'आधी राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये चर्चा होईल, मग शिवसेनेचा विचार करू. आमच्या बैठकीत ज्या गोष्टी ठरतील त्यानंतर शिवसेनेबाबत निर्णय घेऊ.' असे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज काँग्रेस नेत्यांच्या बैठकीनंतर दिले.

राष्ट्रवादीचे हे पाच नेते सांभाळणार चर्चेची पुढील सूत्रे

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांची घेतलेली भेट ही सदिच्छा भेट होती. आधी काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये चर्चा होईल. आमची सूत्रं ठरतील. राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होईल. मगच शिवसेनेशी संवाद साधायचा विचार करू, असे बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले. मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये काँग्रेसची ही बैठक पार पडली. या बैठकीस दिल्लीहून मल्लिकार्जून खर्गे उपस्थित होते. तर राज्यातील बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे व इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते. उद्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होईल व या बैठकीत पुढील निर्णय कळतील.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

दरम्यान, मल्लिकार्जून खर्गे यांनी राज्यपालांवर नाराजीचा सूर व्यक्त केला आहे. काल (ता. 12) राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राष्ट्रवादीला दिलेल्या मुदतीत ते बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. मात्र आता राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेत मोठ्या प्रमाणात हालचाली दिसून येत आहेत.

मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, चिंता नको : शरद पवार

राष्ट्रवादीचे हे पाच नेते सांभाळणार चर्चेची पुढील सूत्रे
काही वेळापूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज पार पडली. या बैठकीत काँग्रेस सोबत समान कार्यक्रम ठरवण्यासाठी 5 जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधीमंडळॉ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balasaheb Thorat speaks after Congress meeting for Government formation