घटस्फोटाच्या उंबरठ्यावरील कुटुंबांचा हास्यमेळ

Family-Court
Family-Court

ठाणे - काही दिवसांपासून गप्प गप्प असणारी ‘ती’ सारी मुले आज प्रचंड खूश दिसत होती. त्यांच्यासाठी अनेक खेळणी, नवे खेळ आणि मित्र-मैत्रिणी मिळाले होतेच; पण त्यांचे आई आणि वडील एकाच वेळी त्यांच्यासोबत होते. हे होते त्यांच्या खुशीमागचे खरे कारण! काही दिवसांपासून ही मुले हसणे जणू विसरलीच होती, गप्प गप्प राहत होती; पण आज कित्येक दिवसांनी त्यांचे इतके हसणे, चेहऱ्यावर इतका आनंद पाहतो आहे, असे उपस्थित पालकांपैकी काहींनी सांगितले. 

कौटुंबिक न्यायालयाच्या वतीने शनिवारी बालकोत्सव साजरा करण्यात आला. इतरवेळी, ‘शांतता कोर्ट चालू आहे’ असे वातावरण असणाऱ्या न्यायालयाच्या आवारात जोरदार हसण्याचे, ओरडण्याचे आवाज येत होते. वेगवेगळ्या वेशभूषेतली ही मुले आपल्या आई-बाबांसोबत इथे आली तेव्हा काहीशी कावरीबावरी झाली होती; पण नंतर समवयस्कांना पाहून ती खेळात रमलीही. एरवी कोणाशीही न बोलणारी, घरात शांत-शांत असणारी मुले न्यायालयाच्याच मैदानात हसतखेळत बागडत असल्याचे पाहून पालकांच्याही चेहऱ्यावर हसू फुलले होते. काहींच्या डोळ्यात त्यासोबत आसूही होते! 

घटस्फोटासाठी अर्ज केलेले पालक आणि त्यांच्या मुलांमधील नाते अधिक खुलवण्यासाठी ठाण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या वतीने या बालकोत्सवासाठी मुलांबरोबर त्याच्या दोन्ही पालकांनीही यावे, अशी अट घालण्यात आली होती. पालकांनीही आपापल्या मुलांसाठी यात हिरिरीने भाग घेतल्याने हा वेगळा प्रयत्न सफल झाल्याचे चित्र न्यायालयाच्या आवारात दिसून येत होते. 

आम्ही विभक्त झालो तेव्हापासून आमचा मुलगा शांत झाल्याचे जाणवते आहे. त्याला सारे काही समजते; परंतु तो मला कोणताही प्रश्‍न विचारत नाही; पण त्याचे खेळणे, इतर मुलांसारखी मस्ती करणे खूपच कमी झाले आहे. त्याचे बालपण कोमेजून जाऊ नये म्हणूनच न्यायालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मी त्याला घेऊन आलो, असे या कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका पालकाने सांगितले. अशीच काहीशी मनस्थिती इतर पालकांचीही होती.

घटस्फोटासाठी जेव्हा पालकांकडून अर्ज केला जातो, तेव्हा मुलांची मानसिकता ही पूर्णतः वेगळी होते. ती गोंधळतात. आई की बाबा यांच्या घरापैकी आपले घर नेमके कोणते हे त्यांना कळत नाही. कोर्टात तारखेला ते दोन्ही पालकांना एकत्रितरीत्या पाहतात; पण कोर्ट हे काही पालकांसोबत वेळ घालवण्याचे उत्तम ठिकाण नाही म्हणता येत. मुलांना आई आणि बाबा दोघांचाही सहवास एकावेळी लाभेल आणि त्यांच्यासोबत 

मला खेळायला खूप आवडते, येथे वेगवेगळ्या खेळांत बाबांबरोबर सहभागी होता आल्याने आनंद वाटला. इतरही मुलांसोबत नव्याने ओळख झाली असून, पुढेही या मित्रांना भेटायला मला आवडेल. 
- देविका कर्वे

मला येथे अनेक मित्र-मैत्रिणी मिळाल्या. येथे येऊन खूप मज्जा आली. 
- आर्या माने

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com