रायगडच्या किनाऱ्यावर विचित्र मासा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

श्रीवर्धन किनाऱ्यावर हा फुग्यासारखा मृत मासा सापडला. त्याचे वजन पाच ते सहा किलो आहे.

मुंबई : गेल्या आठवड्यात रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर मृत व्हेल मासा सापडला. या किनाऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या श्रीवर्धन किनाऱ्यावर हा फुग्यासारखा मृत मासा सापडला. त्याचे वजन पाच ते सहा किलो आहे. त्याच्या शरीरावर टोकदार काटे आहेत. काही दिवसांपासून समुद्राचे पाणी दूषित झाल्यामुळे विविध प्रकारचे मासे किनाऱ्यावर येत असल्याचा अंदाज आहे. असा मासा पहिल्यांदाच पाहिल्याने आश्‍चर्य वाटले, असे स्थानिकांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: balloon type fish found in seashore