नोटाबंदीचा फटका पोलिसांना 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

ठाणे - नोटा चलनातून बाद झाल्यामुळे सर्वत्र गोंधळ सुरू आहे. सर्वसामान्य नागरिक दैनंदिन व्यवहार काटकसरीने करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. सरकारच्या निर्णयाचा फटका पोलिसांनाही बसला आहे. परराज्यात गेलेल्या पोलिसांना तपास अर्धवट सोडून परतायची वेळ आली आहे. 

ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने इफेड्रीन प्रकरणापाठोपाठ मिरा रोड येथील बोगस कॉलसेंटर घोटाळा उघडकीस आणला. या गुन्ह्यांचा तपास करत असताना आरोपींकडून मिळणाऱ्या माहितीनुसार पोलिसांनी अहमदाबाद, दिल्ली, बंगळुरु येथे पथके पाठवली आहेत. त्यातच ठाणे गुन्हे शाखेचे काही पथके तपासासाठी अन्य राज्यांत गेली होती. त्यातील अनेकांना सुटे पैसे नसल्याने अडचणींचा सामना करावा लागला. त्यावर मात करत परराज्यात गेलेली काही पथके सरकारच्या निर्णयानंतर दोन-तीन दिवसांत ठाण्यात आली. नोटाबंदीमुळे परराज्यातील प्रवासावर आता मर्यादा आली आहे. गंभीर गुन्ह्यांतील तपासातही अडचणी वाढल्या आहेत. नियमित चलन मिळेपर्यंत गंभीर गुन्ह्यांचाही तपास थंडावण्याची शक्‍यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. परराज्यात गेल्यानंतर पोलिसांना बराच काळ आपली ओळख लपवून ठेवावी लागते. अशावेळी जवळ नियमित चलन नसल्यास संबंधित पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Ban notes hit the police