पिवळ्या, निळ्या रंगाचे मोदींना वावडे! 

file photo
file photo

मुंबई : अनेकांना रंगांची "ऍलर्जी' असते; पण तो शारीरिक आजार आहे. राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या मोठ्या नेत्यांनाही आता अशीच रंगांची ऍलर्जी होत असल्याचे दिसत आहे; पण हा कोणताही शारीरिक आजार नाही, तर विशिष्ठ रंगांचे कपडे घालणाऱ्या लोकांपासून राजकीय नेत्यांनी घेतलेला "धसका' आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रचाराचा धडाका लावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही असाच काहीसा धसका घेतला आहे. नवी मुंबईतील खारघरमधील मोदींच्या सभेत काळे, पिवळे आणि निळे कपडे परिधान करणाऱ्यांसाठी "नो एन्ट्री'चे आदेश काढण्यात आले. 

पनवेल डोंबिवली, पेण, ऐरोली, बेलापूर मतदारसंघांतील उमेदवारांसाठी पंतप्रधान मोदींची आज खारघर येथील सेंट्रल पार्क शेजारील मैदानात सभा सुरू आहे. कोणीही काळे कपडे परिधान करून सभेच्या ठिकाणी येवू नये, असे निर्देश आधीच पोलिसांनी दिल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे टाळले; मात्र अचानक पिवळे आणि निळे कपडे परिधान केलेल्यांनाही सभास्थळी प्रवेश नाकारण्याची सूचना आल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. त्यामुळे अनेकांना सभेच्या ठिकाणाहून परतीची वाट धरावी लागली. मोदींच्या सभास्थळी कोणीही आंदोलक घुसू नयेत, यासाठी ही काळजी घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पीएमसी बॅंकेवर निर्बंध आल्याने खातेदार संतप्त झाले आहेत. त्यामुळे शीख समुदायाच्या नागरिकांनाही सभास्थळी बंदी घालण्यात आली. धनगर आंदोलनाचा धसका भाजपच्या नेत्यांनी घेतल्याने पिवळे कपडे परिधान केलेल्यांना प्रवेश नाकारण्यात आला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com