विवेकानंद जयंतीला शनिवारवाड्यात मनाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 जानेवारी 2019

मुंबई : स्वामी विवेकानंद यांच्या 158 व्या जयंतीनिमित्त पुण्यातील शनिवारवाड्यात कार्यक्रम घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाबाई भोसले यांचा संयुक्त जयंती कार्यक्रम शनिवारी (ता. 12) होणार होता. 

देश बचाव आघाडी या संस्थेने उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेची सुनावणी न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर झाली. या कार्यक्रमामुळे समाजात कायदा व सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होईल, त्यामुळे परवानगी देता येणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. 

या कार्यक्रमात माजी न्यायाधीश पी. बी. सावंत, न्या. बी. जी. कोळसे पाटील, डॉ. बाबा आढाव यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होणार होते. न्यायव्यवस्था आणि संविधान या विषयावर परिसंवादही होणार होता. पुणे पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने आयोजकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Web Title: Ban on Vivekanad Jayanti celebration in Shaniwarwada