उल्हासनगरातील बंडू देशमुख यांची मनसे शहराध्यक्षपदी वर्णी

दिनेश गोगी
मंगळवार, 10 एप्रिल 2018

उल्हासनगर : पूर्व व पश्चिम अशा दोन अध्यक्षांचा पायंडा खंडित करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी समाजकारण-राजकारणात अजातशत्रू अशी ओळख निर्माण करणारे आणि शाळांच्या विषयाला तडीस नेणारे उल्हासनगरातील बंडू देशमुख यांंची मनसे  शहराध्यक्षपदी वर्णी लावली आहे. देशमुख यांच्यावर शिवसेना-भाजपा-काँग्रेस-रिपाइं-भारिप-पीआरपी अशा सर्व पक्षीय नेत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. 

उल्हासनगर : पूर्व व पश्चिम अशा दोन अध्यक्षांचा पायंडा खंडित करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी समाजकारण-राजकारणात अजातशत्रू अशी ओळख निर्माण करणारे आणि शाळांच्या विषयाला तडीस नेणारे उल्हासनगरातील बंडू देशमुख यांंची मनसे  शहराध्यक्षपदी वर्णी लावली आहे. देशमुख यांच्यावर शिवसेना-भाजपा-काँग्रेस-रिपाइं-भारिप-पीआरपी अशा सर्व पक्षीय नेत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. 

मनसेच्या स्थापनेपासून कार्यरत असलेल्या बंडू देशमुख यांची सात-आठ वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कल्याण जिल्हा उपाध्यक्ष पदावर नियुक्ती होताच,त्यांनी शहर अध्यक्ष मनोज शेलार यांच्या सोबत उल्हासनगर महानगरपालिकाच्या शाळांची दुरावस्था तत्कालीन आयुक्त बालाजी खतगावकर,मनोहर हिरे यांच्या पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिली.

शाळा पुनर्बांधणीची मागणी केली.त्यानुसार अनेक शाळांची दुरुस्ती करण्यात आली असतानाच शाळा क्रमांक 13-14 ची दुमजली इमारत डौलाने उभी राहिली.याशिवाय गोरगरीब उपेक्षित विद्यार्थ्यांना उल्हासनगरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका उभारण्याच्या लक्षवेधक मागणीचा बंडू देशमुख,मनोज शेलार यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यावर तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांनी पक्षभेद विसरून सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपा यांनीही अभ्यासिकेला हिरवा कंदिल दाखवला.दोन अडीच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेले या अभ्यासिकेचे काम पूर्णत्वास आले असून लवकरच महाराष्ट्रातील पहिल्याच अशा या अभ्यासिकेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

मनसे नेते राजू पाटील, सरचिटणीस प्रकाश भोईर, काका मांडले, कल्याण अध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी दिलेल्या अहवालानुसार राज ठाकरे यांनी बंडू देशमुख यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. या स्पर्धेत माजी अध्यक्ष सचिन कदम, संजय घुगे, पालिका कामगार युनिटचे अध्यक्ष दिलीप थोरात हे देखील होते. मात्र सर्वपक्षीय नेत्यांशी आपुलकीचे नाते जपताना समाजकारण-राजकारणात अजातशत्रूची ओळख निर्माण करणारे बंडू देशमुख यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी विश्वास टाकल्याने येणाऱ्या काळात किंबहूना पालिका निवडणुकीत मनसे कमबॅक करणार.अशी शक्यता वर्तवली जात आहे.पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक सर्व जेष्ठ मनसैनिकांसोबत पक्षाला वाढवण्यासाठी आणि निवडणुकीत ठसा उमटवतानाच अधिकांश नगरसेवक निवडून आणण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करणार.अशी प्रतिक्रिया नवनियुक्त शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी व्यक्त केली.

Web Title: bandu deshmukh appointed as mns city president