उपअभियंत्याकडे बांगड्या भिरकावल्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

मुंबई : गेल्या वर्षभरापासून वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग 548 (अ) रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गाची दुरवस्था झाली आहे. महामार्गाच्या प्रश्‍नावर पाली तहसील कार्यालयात शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या वेळी लता कळंबे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता सचिन निफाडे यांच्या दिशेने बांगड्या भिरकावून संताप व्यक्त केला. 

एमएसआरडीसी आणि कंत्राटदारांच्या गलथान कारभाराविरोधात मनसे रायगड जिल्हा सचिव लता कळंबे यांनी स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा पाली तहसीलदारांना शुक्रवारी (ता.9) दिलेल्या निवेदनात दिला आहे. गणेशोत्सव तोंडावर आला असताना कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हाल होत आहेत. जांभूळपाडा, अंबा नदी पूल धोकादायक स्थितीत असून केव्हाही कोसळण्याची भीती व्यक्‍त होत आहे.

येत्या आठ दिवसांत रस्ता सुस्थितीत न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचे कळंबे यांनी निवेदनात म्हटले आहे. पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीस नायब तहसीलदार वैशाली काकडे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता सचिन निफाडे, मनसे जिल्हा सचिव लता कळंबे, मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे, प्रकल्प संचालक राकेश खोल्लार, राहुल इंगळे, प्रफुल चांदोरकर आदींसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता सचिन निफाडे यांनी महामार्गाच्या कामात सुधारणा व्हावी, या दृष्टीने प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bangles were thrown to the subcontinent