बॅंक कर्मचाऱ्यांचा बुधवारी संप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

मुंबई - विजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा या तीन बॅंकांच्या विलीनीकरणाला विरोध करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील नऊ संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्स’ने (यूएफबीयू) बुधवारी (ता. २६) एक दिवसीय संपाची हाक दिली आहे. सुमारे दहा लाख कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. मंगळवारी (ता. २५) नाताळनिमित्त सार्वजनिक सुटी असून बुधवारी संप होणार असल्याने सार्वजनिक आणि काही खासगी बॅंकांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 

विशाल बॅंकांसाठी केंद्र सरकार आग्रही आहे. गत वर्षी भारतीय स्टेट बॅंकेत सहयोगी बॅंका आणि भारतीय महिला बॅंकेचे विलीनीकरण केले होते. त्यानंतर आता विजया बॅंक आणि देना बॅंक या दोन बॅंकांचे बॅंक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण केले जाणार आहे. यामुळे बॅंक ऑफ बडोदा देशातील तिसरी मोठी बॅंक बनेल. दरम्यान, या विलीनीकरणाला कर्मचारी संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. विलीनीकरण ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचे नसून यामुळे नुकसान होईल, असा दावा ‘यूएफबीयू’ने केला आहे. विलीनीकरणानंतर शाखा कमी कराव्या लागतील. नोकऱ्यांवर गदा येईल; परिणामी सरकारी योजना राबवणे कठीण जाईल, अशी भीतीही ‘यूएफबीयू’ने व्यक्‍त केली आहे.

Web Title: Bank Employee Strike