डेब्रिजसाठी हवी बँक गॅरंटी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

मुंबई - नव्या प्रकल्पांसाठी परवानगी मिळवताना इमारत उभारतेवेळी निर्माण होणारा राडारोडा महापालिकेने ठरवलेल्या १० जागांवरच टाकण्याची हमी विकसकांना द्यावी लागणार आहे. त्यासाठी प्रकल्पाच्या क्षेत्रफळानुसार पाच लाख रुपयांपासून ५० लाखांपर्यंतची बॅंक गॅरंटीही द्यावी लागणार आहे. नियमानुसार डेब्रिजची विल्हेवाट न लावल्यास बॅंक गॅरंटी जप्त करण्याबरोबर पालिका बांधकाम परवानगीही रद्द करू शकते.

मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईत बांधकाम करण्यावर घातलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांसाठी शिथिल केली आहे. ती करताना बांधकामातून निर्माण होणारे डेब्रिज पालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडवर न टाकता तो इतर ठिकाणी टाकला जावा, अशी अट न्यायालयाने घातली आहे. त्यामुळे डेब्रिज टाकण्यासाठी पालिकेने मुंबईबाहेरील १० जागांची निवड केली आहे. विकसकांना तेथेच डेब्रिज टाकावे लागणार आहे. बांधकामाला परवानगी देताना तसे हमीपत्र विकसकांकडून लिहून घेतले जाणार आहे. 

अशी असेल बॅंक गॅरंटी 
क्षेत्रफळ .... रक्कम (लाख रुपयांमध्ये) 
 ७५० चौरस मीटरपर्यंत     - ५
 १५०० चौरस मीटरपर्यंत     - १०
 दोन हजार चौरस मीटरपर्यंत     - १५ 
 दोन हजार ५०० चौ.मी.पर्यंत     - २० 
 तीन हजार चौरस मीटरपर्यंत     - २५ 
 तीन हजार ५०० चौ.मी.पर्यंत     - ३० 
 चार हजार चौरस मीटरपर्यंत     - ३५ 
 चार हजार ५०० चौ. मी.पर्यंत     - ४० 
 पाच हजार चौरस मीटरपर्यंत     - ४५ 
 पाच हजार चौरस मीटरपुढे     - ५०

Web Title: Bank Guarantee for Debrajage