बॅंक अधिकाऱ्याला आत्महत्येप्रकरणी गोरेगावमध्ये अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

मुंबई : जोगेश्‍वरी पूर्व येथील रहिवासी ज्योती पाटेकर (१९) हिच्या आत्महत्येप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी गुरुवारी (ता. २८) बॅंक अधिकाऱ्याला अटक केली. नितीन सेवाराम खन्ना असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी या प्रकरणात नितीनची पत्नी हिनाला आरोपी म्हणून दाखवले आहे. मूळची रत्नागिरीची असलेली ज्योती नितीनच्या घरी दीड वर्षापासून घरकामाला होती. तीन दिवसांपूर्वी तिने नैराश्‍यातून आत्महत्या केली. याप्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नितीनसह  पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला.

Web Title: Bank officer arrested in Goregaon

टॅग्स