50 पैशांची नाणी घेण्यास बॅंकेचा नकार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

ठाणे - ठाण्यातील स्टेट बॅंकेने अरविंद कुलकर्णी यांना अडीच हजारांची पन्नास पैशांची नाणी दिली. कुणीही स्वीकारत नसल्याने ती बदलण्यासाठी गेलेल्या कुलकर्णी यांना बॅंकेतील गर्दीचे कारण देऊन पिटाळण्यात आले. 

ठाणे - ठाण्यातील स्टेट बॅंकेने अरविंद कुलकर्णी यांना अडीच हजारांची पन्नास पैशांची नाणी दिली. कुणीही स्वीकारत नसल्याने ती बदलण्यासाठी गेलेल्या कुलकर्णी यांना बॅंकेतील गर्दीचे कारण देऊन पिटाळण्यात आले. 

कुलकर्णी यांचे पोळीभाजी केंद्र असल्याने त्यांना सतत सुट्या पैशांची गरज असते. तीन आठवड्यांपूर्वी स्टेट बॅंकेतून एक व दोन रुपयांच्या नाण्यांची त्यांनी मागणी केली होती. त्यानुसार बॅंकेने त्यांना सुटे पैसे दिले. एक व दोनच्या नाण्यांसोबत 50 पैशांची नाणी त्यात होती. पन्नास पैशांची पाच हजार नाणी त्यात होती. पोळीभाजी केंद्रात ग्राहकांना ती देण्याचा प्रयत्न केला; मात्र कोणीही 50 पैसे घ्यायला तयार नव्हते. कुलकर्णी नाणी परत करण्यासाठी बॅंकेत आले होते; मात्र सध्या नोटा बदलीमुळे बॅंकेतील गर्दीचे कारण देत त्यांना ती बदलून देण्यास नकार दिला. आमच्या वरिष्ठ आलेल्या नाहीत, अशी कारणे जोडायला अधिकारी विसरले नाहीत. त्यामुळे कुलकर्णी यांना नाणी घेऊन परतावे लागले. बॅंकेने 50 पैशांची नाणी न घेतल्याने ती व्यवहारात आहेत की नाही, हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

Web Title: The bank refused to cash the coins 50

टॅग्स