बेकायदा संस्थांना बॅंकांनी कर्ज देऊ नये - सुरेश प्रभू 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 12 मे 2018

मुंबई -  बॅंकांनी कर्ज देताना छाननी करणे आवश्‍यक आहे. बेकायदा संस्थांना कर्ज देऊ नये, असे आवाहन वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. सराफा उद्योगातील वित्त पुरवठ्याबाबत आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत ते बोलत होते. हिरे व्यापारी नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बॅंकेत केलेल्या आर्थिक घोटाळ्यानंतर बॅंकांनी सराफा उद्योगाला वित्त पुरवठा करण्याबाबत सावधगिरीची भूमिका घेतली आहे. 

सुरेश प्रभू म्हणाले, सराफा उद्योगात निर्यातीची संधी आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. बॅंकांनी आपली यंत्रणा माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे सक्षम केली पाहिजे. बॅंकांनी जोखीम कमी करण्यासाठी नावीन्यपूर्ण उत्पादने विकसित करावीत. बॅंका, एक्‍सपोर्ट क्रेडिट ग्यारंटी कॉर्पोरेशन एकत्र आल्यास सराफा उद्योगाच्या अर्थसाह्य मिळवण्यातील अडचणी दूर होतील. या परिषदेला वाणिज्य सचिव रिता तिओटिया, दि जेम्स अँड ज्वेलरी एक्‍स्पोर्ट प्रमोशनल कौंसिलचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: Banks should not lend to illegal organizations - Suresh Prabhu