आशियातील सर्वात लठ्ठ महिलेवर बेरीएट्रीक शस्त्रक्रिया यशस्वी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मे 2019

मुंबई : पालघर जिल्ह्यातील वसई येथे राहणाऱ्या 42 वर्षांच्या अमिता राजानी या आशियातील सर्वात लठ्ठ महिला म्हणून प्रसिद्ध होत्या. मात्र बॅरिएट्रीक शस्त्रक्रियेच्या मदतीने त्यांनी 214 किलो वजन गेल्या चार वर्षांत कमी केले. प्रसिद्ध बॅरिएट्रीक सर्जन व लॅपोरे ओबेसो सेंटरचे संस्थापक डॉ शशांक शहा यांनी अमिता राजानी यांच्यावर बॅरिएट्रीक शस्त्रक्रिया करुन त्यांच्यात हा कायापालट करुन दिला. शस्त्रक्रियेअगोदर त्या आठ वर्षे अंथरुणाला खिळून होत्या. 

अमिता यांना जन्मापासून कोणताच शारिरीक त्रास नव्हता. इतर लहानमुलांप्रमाणेच त्यांचे वजन सामान्य होते. सहा वर्षानंतर त्यांचे वजन अचानक वाढू लागले. सोळाव्या वर्षी अमिता यांचे वजन एकशे सव्वीस किलोवर पोहोचले. वाढत्या वजनामुळे त्यांच्या दैनंदिन क्रियेतही अडथळा येऊ लागला. काही वर्षानंतर त्यांचे वजन तीनशे किलोवर पोहोचले. वाढत्या वजनावर अमिता यांनी उपचारही सुरु केले. भारत आणि युकेमधील नामांकित डॉक्‍टरांना त्यांच्या वाढत्या वजनामागील कारण सापडत नव्हते. अमिता यांचे घराबाहेर जाणे पूर्णपणे बंद झाले.

आपल्या दैनंदिन कार्यासाठी त्या पूर्णपणे परावलंबी झाल्या. दम्याच्या विकारामुळे त्यांना ऑक्‍सिजनचाही आधार घेणे, मधुमेह- 2, मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाड, कर्बोदकांचे प्रमाण घटणे आदी समस्यांना अमिता सामोरे जात होत्या. 

बॅरिएट्रीक सर्जन डॉ शशांक शहा यांनी 2015 साली अमिता यांच्यावर स्लीव्ह गॅस्ट्रोक्‍टोनॉमी ही चयापचय शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर त्या चालू लागल्या. 2017 साली अमिता यांच्यावर गॅस्ट्रीक बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी त्यांचे वजन 140 किलोपर्यंत घटलेले होते. त्यानंतर अमिता यांच्या शरीराची हालचाल होऊ लागली आणि दोन वर्षांत आपोआप वजन 86 किलोपर्यंत घटल्याची माहिती डॉ शाह यांनी दिली. 
सुरुवातीच्या काळात मी बरी होईल, हा आत्मविश्वास मी पूर्णपणे गमावून दिला होता. मात्र पहिल्या शस्त्रक्रियेनंतर मला जगण्याची नवी उमेद मिळाली. मी बरी होणार ही सकारात्मक उर्जा बाळगली, या शब्दांत अमिता यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bariatric surgery on a lady at Mumbai