कामाच्या ठिकाणी बॅरिकेड्‌स हवेच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

मुंबई - मुंबईत रस्त्यांची कामे धडाक्‍यात सुरू आहेत; मात्र बॅरिकेड्‌स न लावता कंत्राटदार बेदरकारपणे कामे करीत आहेत. नियमांची पायमल्ली करणाऱ्या कंत्राटदारांविरुद्ध पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. पूर्व उपनगरातील बेफिकीर कंत्राटदारांकडून तब्बल ३४ लाख ८६ हजार रुपयाचा दंड वसूल केल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.

मुंबई - मुंबईत रस्त्यांची कामे धडाक्‍यात सुरू आहेत; मात्र बॅरिकेड्‌स न लावता कंत्राटदार बेदरकारपणे कामे करीत आहेत. नियमांची पायमल्ली करणाऱ्या कंत्राटदारांविरुद्ध पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. पूर्व उपनगरातील बेफिकीर कंत्राटदारांकडून तब्बल ३४ लाख ८६ हजार रुपयाचा दंड वसूल केल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.

सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेड्‌स लावणे बंधनकारक आहे. मुंबईत सध्या विविध ठिकाणी रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. कामे सुरू असताना पादचाऱ्यांची आणि वाहनचालकांची सुरक्षा लक्षात घेऊन कामाच्या ठिकाणी सुयोग्य बॅरिकेड्‌स लावणे बंधनकारक आहे; मात्र काही रस्ते कंत्राटदार बॅरिकेड्‌स लावण्याबाबत दिलेल्या सूचनांचे पालन करण्यात कुचराई करीत असल्याचे पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे कंत्राटदारावर नियमानुसार दंड आकारण्याचे आदेश आयुक्तांना पालिका आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार दंडआकारणीला सुरुवात झाली आहे. रस्ते कामांच्या ठिकाणी बॅरिकेड्‌स न लावणाऱ्या पूर्व उपनगरातील १९ कंत्राटदारांना ३४ लाख ८६ हजार ५०० रुपये एवढा दंड पालिकेने ठोठावल्याची माहिती रस्ते खात्याचे प्रमुख अभियंता विनोद चिठोरे यांनी दिली. 

दंड ठोठावण्यात आलेले १९ कंत्राटदार पूर्व उपगरातील कुर्ला, गोवंडी, चेंबूर, घाटकोपर आणि भांडुप भागात काम करणारे आहेत.

कंत्राटदारांकडून आकारलेला दंड
मे. स्पेको इन्फ्रास्ट्रक्‍चर - १२ लाख ८१ हजार ५०० रु.
मे. एपीआय सिव्हिलकॉन प्रा. लि. - बिटकॉन इंडिया’ (संयुक्त उपक्रम) - ६ लाख रु.
मे. प्रकाश इंजिनिअर्स ॲण्ड इन्फ्रा प्रोजेक्‍ट्‌स प्रा. लि. - ४ लाख ६६ हजार ५०० रु.
मे. शांतिनाथ रोडवेज, मे. लॅण्डमार्क कॉर्पोरेशन प्रा. लि., मे. जी. एल. कन्स्ट्रक्‍शन, मे. ब्युकॉन इंजिनिअर्स ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा. लि., मे. देव इंजिनिअर्स, मे. नवदीप कन्स्ट्रक्‍शन कंपनी, मे. न्यू इंडिया कन्स्ट्रक्‍शन ॲण्ड ग्यान, मे. महावीर रोड्‌स ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा. लि., मे. न्यू इंडिया कन्स्ट्रक्‍शन कंपनी, मे. प्रीती कन्स्ट्रक्‍शन कंपनी, मे. एम. बी. इन्फ्रा प्रोजेक्‍ट्‌स, मे. शाह ॲण्ड पारीख, मे. एम. ई. इन्फ्राप्रोजेक्‍ट्‌स प्रा. लि., मे. एच. व्ही. कन्स्ट्रक्‍शन, मे. निव इन्फ्रा लि. आणि सनराईज स्टोन इंडस्ट्रीज - ११ लाख ३९ हजार रु.

Web Title: barrigate at work place important