बिरवाडी पूल वाहतुकीसाठी बंद

नंदकिशोर मलबारी  
मंगळवार, 10 जुलै 2018

सरळगांव : कल्याण मुरबाड या राष्ट्रीय महामार्गा लगत असलेला बिरवाडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.  कल्याण - मुरबाड या रस्त्यावरून आल्यानंतर बिरवाडी गावाकडे जाण्यासाठी ह्या पूलाचा उपयोग बिरवाडी व मासले ग्रामस्थ अनेक वर्ष करत होते. या पूलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात अनेक वेळा या पुलावर पाणी येते. तातपूर्त्या स्वरूपात वाहातूक बंद होत असते. हा पूल कमकुवत झाल्याने या पुलालगतच नव्या पुलाचे बांधकाम सूरू आहे.

मात्र, या नव्यापूलाचे काम पूर्ण न झाल्याने आजही हा पूल वापरात आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे व कमकुवत झाल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने बिरवाडी गावाचा संपर्क तूटत नसला तरी मासले या गावातून ग्रामस्थांना व वाहाकांना ये-जा करावी लागणार आहे. मासले व बिरवाडी या गावांना जाण्या येण्यासाठी असलेला बिरवाडी पूल कमकुवत झाला आहे. यासाठी या पूलावरील वाहातूक बंद करण्यात आली आहे. 

बिरवाडी पुलावरून जाणा-येणा-या जनतेस व वाहान चालकांना सूचित करण्यात येत आहे की हा पूल कमकुवत झाल्याने ग्रामस्थांनी व वाहान चालकांनी आपला जीव धोक्यात घालून या पुलावरून जा-ये करू नये.
- सचिन चौधर, तहसिलदार मुरबाड 

Web Title: Barwadi bridge closed for transportation