बीडीडीतील सर्वेक्षण उधळले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

शिवडी - नायगाव येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी फोटो पास सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या उपजिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना तेथील रहिवाशांनी मंगळवारी (ता. १५) कडाडून विरोध केला. शब्दांचे खेळ करत प्रशासन रहिवाशांची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. आमच्या सर्व मागण्या मान्य करा, लेखी करार करा; नंतरच असले सर्वेक्षण करा, अशी मागणीही त्यांनी केली.

यापूर्वी पुनर्विकासासाठी बीडीडी चाळींतील रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण बंधनकारक असल्याचा फतवा प्रशासनाने काढला होता. त्यास अनेक रहिवाशांनी विरोध दर्शवला होता. ज्या रहिवाशांचे  बायोमेट्रिक सर्वेक्षण झाले, त्यांना पात्र-अपात्र असल्याचे पत्र उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून चार महिन्यांनंतरही मिळालेले नाही. बायोमेट्रिक सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या रहिवाशांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहेत, असा दावा या रहिवाशांनी या वेळी केला.

अन्यथा उद्रेक!
पुनर्विकासाचे कारण पुढे करत सरकार रोज नवनवीन सर्वेक्षणाच्या कल्पना घेऊन चाळधारकांना त्रास देत आहे. चुकीच्या पद्धतींचा अवलंब करण्यापेक्षा सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात. सरकारकडून होणारा त्रास कायम राहिल्यास रहिवाशांचा उद्रेक होईल. त्यास सर्वस्वी सरकारच जबाबदार असेल, असा इशारा रहिवाशांनी या वेळी दिला.

सर्व रहिवाशांना पात्र ठरवण्यास प्रशासन तयार नाही. मागण्या मान्य होईपर्यंत आमचा विरोध कायम असेल. त्याबाबत म्हाडाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत.
- डॉ. राजू वाघमारे, अध्यक्ष, अखिल बीडीडी चाळ रहिवासी संघ

Web Title: BBD Chawl Survey

टॅग्स