बीसीसीआयने आम्हाला सदस्यत्व द्यावे - टीसीए

दिनेश चिलप मराठे
शुक्रवार, 11 मे 2018

मुंबई : मुंबई प्रेस क्लब येथे 'दी तेलंगणा क्रिकेट एसोसिएशन' (टीसीए) तर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यानी तेलंगना क्रिकेट असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन बीसीसीआयने आम्हाला सदस्यत्व द्यावे अशी मागणी केली असल्याचे सांगितले. या संदर्भात बीसीसीआयमध्ये गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरु असून हा प्रश्न प्रलंबित असल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यानी म्हटले आहे. या पत्रकार परिषदेत टीसीएचे उपाध्यक्ष हरिनाथ रेड्डी, सहसचिव श्रीनिवास घारगे उपस्थित होते.

तेलंगणातील 30 जिल्ह्यात विविध वयोगटातील जवळपास 12 हजार मुले-मुली क्रिकेट खेळ खेळतात. अशी माहिती तेलंगणा क्रिकेट असोसिएशनचे महासचिव धरम रेड्डी यांनी दिली. रेड्डी पुढे म्हणाले की, हैद्राबाद क्रिकेट असोसिएशन फक्त हैद्राबाद शहरात राहणाऱ्या क्रिकेटर्स करीता आहे. तीन वर्षा पूर्वीच टीसीएने बीसीसीआयला कळविले होते की, तेलंगना राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूना राष्ट्रीयस्तरावर आपले कसब दाखविण्याची संधी द्यावी. टीसीएने आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सैय्यद आबिदअली यांच्या सहित खेळाडूना नवयुवक आणि युवतीना प्रशिक्षण दिलेले आहे.

तेलंगणा सरकारने एल.बी.स्टेडियम आणि अन्य खेळांची मैदाने क्रिकेट खेळण्यास उपलब्ध करुन दिलेली आहेत. गेल्या तीन वर्षापासून बीसीसीआयच्या नियमानुसार 14 हजार सामने खेळविण्यात आलेले आहेत. 29 लीग सामनेही खेळविण्यात आलेले असल्याची माहितीही टीसीएने दिली आहे. 

Web Title: BCCI should give a membership - TCA