बीडीडी पुनर्विकास तीन टप्प्यांत

बीडीडी पुनर्विकास तीन टप्प्यांत

मुंबई - बीडीडी चाळ पुनर्विकास प्रक्रियेत नायगाव, ना. म. जोशी मार्ग व शिवडी येथील रहिवाशांना संक्रमण शिबिरांत स्थलांतर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) सात वर्षांत तीन टप्प्यांत बीडीडी चाळींचा पुनर्विकास होणार आहे. येथील १६ हजार रहिवाशांच्या पात्रतेच्या निकषात बदल करण्याची मागणी सरकारने मान्य केली आहे. 

नायगाव परिसरातील काही व्यक्ती पुनर्विकासाला विरोध करत असल्यामुळे म्हाडा कायद्यानुसार त्यांना नोटिसा बजावून सक्तीने घरांतून बाहेर काढले जाणार आहे. पुनर्विकासाला विरोध करणाऱ्या रहिवाशांनी २५ लाखांपर्यंत कॉर्पस फंड, बायोमेट्रिक सर्व्हे रद्द करा, पात्रतेचे निकष शिथिल करा आदी मागण्या केल्या आहेत. राज्य सरकारने २५ लाखांचा कॉर्पस फंड वगळता अन्य मागण्या मान्य करण्याचे संकेत दिले आहेत. वरळी बीडीडी चाळींमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांची घरे दिली जातील. 

नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी कमेन्समेंट सर्टिफिकेट (सीसी)पर्यंतच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. लोअर परळ येथील पहिल्या फेरीचे काम सुरू असून, सात चाळींतील रहिवाशांची पात्रता निश्‍चित झाली आहे. 

पुनर्विकास प्रक्रियेला आता गती मिळत आहे. रहिवाशांसोबत केल्या जाणाऱ्या ऑनलाईन कराराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दर १५ दिवसांनी कामाचा आढावा घेतला जाईल.
- मधू चव्हाण, अध्यक्ष, मुंबई मंडळ, म्हाडा

नायगाव
 ३३४४ रहिवासी
 पोलिसांच्या ६० इमारतींमधील रहिवाशांचे सेंच्युरी मिल संक्रमण शिबिरात स्थलांतर.
 एमआयजी गटातील १४०८, एचआयजी गटातील ४४८ सदनिका.
 वाणिज्यिक वापरासाठी २१ हजार ४५५ चौरस मीटर क्षेत्रफळ.
 पुनर्विकासासाठी २३ मजली आणि विक्रीसाठी ६० मजली इमारत.

वरळी
 ९६८९ रहिवासी
 एमआयजी गटातील ३२२४, एचआयजी गटातील १७७२ सदनिका.
 वाणिज्यिक वापरासाठी ९८१४ चौरस मीटर क्षेत्रफळ.
 पुनर्विकासासाठी २३ मजली आणि विक्रीसाठी ६६ मजली इमारत.

ना. म. जोशी मार्ग
 २४८० रहिवासी
 एमआयजी गटातील ७२८, एचआयजी गटातील ५४० सदनिका.
 वाणिज्यिक वापरासाठी २६ हजार ६३६ चौरस मीटर क्षेत्रफळ.
 पुनर्विकासासाठी २३ मजली, विक्रीसाठी ४० मजली इमारत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com