शिवसेनेच्या महिला पदाधिकार्यासह तिच्या पतीला बेदम मारहाण

खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
आशा रसाळ
आशा रसाळSakal

डोंबिवली - शिवसेना आणि भाजपमध्ये सुरु असलेला सोशल मिडीया वॉर विकोपाला गेल्याचे कल्याणमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे समोर आले आहे. शिवसेना महिला उपशहर प्रमुख आशा रसाळ यांना सात ते आठ जणांच्या टोळक्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. भाजप विरोधात समाज माध्यमावर सातत्याने पोस्ट करत असल्याचे सांगत या टोळक्याने मारहाण केल्याचा आरोप रसाळ यांनी केला आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात 0 नंबरने तक्रार दाखल करीत ती पडघा पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे.

कल्याण पूर्व भागात राहणाऱ्या आशा रसाळ या शिवसेनेच्या उपशहर प्रमुख आहेत. 18 तारखेला रात्री जेवण करण्यासाठी त्या त्यांच्या पत्नीसोबत कल्याण नजीकच्या बापगाव परिसरात एका हॉटेल मध्ये गेल्या होत्या. हॉटेल मध्ये गर्दी असल्याने त्या उभा होत्या. यावेळी काही जण त्यांना शिविगाळ करत होते. आशा रसाळ यांचा आरोप आहे की त्या ठिकाणी सात आठ जणांनी त्यांना आणि त्यांच्या पतीला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. कोळसेवाडीतील घटनेनंतर तुम्ही सोशल मिडियावर जास्त टारगेट करीत आहात असे आशा यांना सांगितले. इतकेच नाही तर त्या रिक्षातून कल्याण पश्चिमेतील निक्की नगर भागात पोहचल्या असता, त्याठिकाणी येऊन सात ते आठ जणांच्या टोळक्याने त्यांना मारहाण केली.

याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक पवार यांनी सांगितले, शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास पडघा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिवसेना महिला कार्यकर्त्या रसाळ या पतीसोबत जेवण करण्यासाठी गेल्या होत्या. त्या सोशल मिडीयावर फार अॅक्टिव्ह असतात असे सागंत पती पत्नीला मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्या घरी जात असताना निक्कीनगर येथे आल्या असता त्यांना पुन्हा मारहाण करण्यात आली आहे. ही घटना पडघा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याने 0 नंबरने खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, ती पडघा पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहे.

माझा काही संबंध नाही...

मारहाणी दरम्यान एकाने मी माजी आमदार नरेंद्र पवार यांचा नातेवाईक असल्याचे रसाळ यांनी तक्रारीत म्हटले आहे. याबाबत भाजपचे माजी आामदार नरेंद्र पवार यांनी सांगितले की या घटनेचा मी निषेध करतो. शिवसेनेच्या आशा रसाळ यांना मारहाण झाल्याचे त्यांनी स्वतः मला सांगितले. त्यातील एक जण मी नरेंद्र पवार याचा भाऊ असल्याचे सांगत असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारच्या कोणत्याही मारहाणीत माझा भाऊ जरी असला तरी त्याच्यावर रितसर कायदेशीर कारवाई झाली पाहीजे. कोणत्याही महिलेला मारहाण करणे, अपशब्द वापरणे हे निषेधार्ह आहे. मी स्वतः या गोष्टीचा निषेध करतो. पोलिसांनी निपक्षपणे याची चौकशी करुन कारवाई करावी. या प्रकरणाचा माझा थेट कोणताही संबंध नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com