मुंबईत ब्युटी सेंटरला आग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

मुंबई - खार पश्‍चिमेतील स्वामी विवेकानंद मार्गावरील न्यू ब्युटी सेंटर या सात मजली इमारतीच्या तळघरात रविवारी सकाळी 10.20 वाजता आग लागली. इमारतीतील अंतर्गत अग्निप्रतिबंधक यंत्रणा बंद असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी जिवावर उदार होऊ आग आटोक्‍यात आणली. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली, तरी अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आगीमुळे तळमजल्यात जमा झालेल्या धुरामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. त्यामुळे पंपाद्वारे बाहेरील हवा आतमध्ये सोडली जात होती. इमारतीत दोन मजली तळघर असूनही अंतर्गत अग्निसुरक्षा यंत्रणा बंद होती. तसेच येथे मोठ्या प्रमाणात पॅकेजिंग साहित्य, सौंदर्य प्रसाधने, वीजवाहिन्या यामुळे आग अधिकच भडकली.
Web Title: Beauty Center Fire Loss