कोरोनामुळे हजारो मुले झाली बालकामगार

स्थलांतरित, आर्थिक संकटांनी पिचलेल्या कुटुंबातील मुले बनली बालकामगार
Marathi News Khopoli news bounded labour child labour
Marathi News Khopoli news bounded labour child labour

मुंबई: कोरोनामुळे (corona virus) मागील दोन वर्षात हजारो मुले महाराष्ट्रात बालकामगारांच्या खाईत लोटले असल्याचा अंदाज राज्यातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत संघटनाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे, तर दुसरीकडे दोन वर्षात शाळा बंद असल्याने तसेच रोजगारासाठी स्थलांतर (migration) झाल्याने हजारो मुलांवर बालकामगार बनण्याची वेळ ओढवली असून त्यासाठी सरकारने वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर राज्यातील एक मोठी पिढी बाल कामगार होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. यासोबत देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणावर आई वडिलांचे छत्र हरवल्याने ही अनेक मुले ही आधार नसल्याने बालकामगार झाल्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. (Because of corona virus situation child labour problem grows)

मागील काही दिवसांपूर्वी युनिसेफने जाहीर केलेल्या एका अहवालात जगभरात 2016 मध्ये 94 दशलक्ष बालकामगार होते, ती संख्या आता 160 दशलक्ष इतकी पोचली असल्याने याबाबत चिंता व्यक्त केली आहे.तर भारतातही हे चित्र भयावह असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात मागील वर्षभरात शाळा बंद असल्याने 6 ते 14 या वयोगटातील मुले आपल्या आईवडिलांना मदत करण्यासाठी शाळा सोडून शेती, घरकाम आदी करत आहेत, यात ग्रामीण आणि आदिवासी भागातील मुलांचा समावेश आहे.

Marathi News Khopoli news bounded labour child labour
प्रशांत किशोर NCPसाठी रणनीती आखणार? नवाब मलिकांनी दिलं उत्तर

तर राज्यातून बाहेर स्थलांतरीत कुटुंबांची संख्या 30 लाख तर बाहेरच्या राज्यातून स्थलांतर होऊन येणारे, 90 लाख कुटुंब आहेत, त्यांच्यासोबत त्यांची मुले असतात, त्यांना आपोआप बालकामगार होण्याची वेळ ओढवली जात असल्याचे संघर्ष वाहिनीचे प्रमुख दीनानाथ वाघमारे यांनी सांगितले.

Marathi News Khopoli news bounded labour child labour
व्हॉट्स अ‍ॅप स्टेटसमुळे पत्नीला वाचवता आले पतीचे प्राण

अशी आहे स्थलांतरित मुलांची आकडेवारी...

2011 च्या जनगनाच्या आंतरराज्यीय स्थलांतरित मजुरांच्या कुटुंबच्या सोबत 5 ते 9 वर्षे वयोगटातील एकूण मुले मूली 61.14 लाख, 9.57 टक्के असतात. तसेच ,10 ते 14 वर्षे वयोगटातील एकूण मुले मूली 34.20 लाख 5.36 टक्के , 15 ते 19 वर्षे वयोगटातील एकूण मुले मूली 80.64 लाख, 8.69 टक्के आणि 0 ते 19 वर्षे वयोगटातील एकूण मुले मूली 430.51 लाख, 31.98 टक्के मुले असतात.

आरटीई कायद्यानुसार स्थलांतरित...

6 ते 14 वर्ष वयोगटातील आरटीई नुसार 1.75 लाख मुले मूली स्थलांतरित होत असून ते शिक्षणपासुन वंचित होतात, ही मुले आरटीई नुसार कोणत्याही परिस्थितीत शाळेत असायला हवी, ही जर शाळेत नसतील तर ती कुठे तरी शाळेत कामात व्यस्त असतील म्हणजेच ते बालकामगार म्हणून कामात व्यस्त आहेत..

सरकारी आकडेवारी म्हणते...

बालकामगार मुक्त राज्य करण्यासाठी राज्य सरकारच्या विविध विभागांनी 2017 ते 2020 या कालावधीत 993 धाडी टाकल्या, 637 बाल कामगाराना मुक्त करण्यात आले, तर 228 मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती बाल कामगार विभागाकडून देण्यात आली. कोरोना मुळे बालकामगार किती आहेत, याची निश्चित आकडेवारी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com