esakal | पावसाचा कहर! पालघर-वाडा-देवगाव राज्यमार्ग बंद
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाचा कहर! पालघर-वाडा-देवगाव राज्यमार्ग बंद

पावसाचा कहर! पालघर-वाडा-देवगाव राज्यमार्ग बंद

sakal_logo
By
भगवान खैरनार ः सकाळ वृत्तसेवा

मोखाडा:  ठाणे, मुंबई, पालघर, वसई या शहरांना पावसाने झोडपले असताना, पावसाने आपला मोर्चा पालघरच्या ग्रामीण (palghar rural area) भागाकडे वळवला आहे. रविवारी  18  जुलैला मोखाड्यात (mokhada) कहर करत पाऊस कोसळला आहे. त्यामुळे वाडा - खोडाळा या राज्यमार्गावर दरड कोसळून (land slide) वाहतुक ठप्प झाली आहे. खोडाळा  - कसारा राज्यमार्गावर झाड कोसळल्याने येथील वाहतूक बंद झाली आहे. गाव, खेड्यापाड्यातील (village) शेतांचे बांध फुटले असून लावणी केलेले ऊभे पीक वाहुन गेले आहे. तालुक्यातील अनेक गावपाड्यांचा विद्युतपुरवठा खंडित झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक  212  मी मी पावसाची नोंद मोखाड्यात झाली आहे. (Because of heavy rain palghar wada road closed dmp82)

आठवड्यापूर्वी शेतकरी खरीपाच्या लावणीसाठी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत होता.  या आठवड्यात पावसाने तुरळक हजेरी लावली. मात्र, शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला आहे. रविवारी  18  जुलैला कोसळलेल्या पावसाने, वाडा- खोडाळा या राज्यमार्गावर दरड कोसळली आहे. तर खोडाळा- कसारा या राज्यमार्गावर झाड कोसळल्याने दोन्ही राज्यमार्गावरील सार्वजनिक वाहतूक बंद झाली आहे.

हेही वाचा: उल्हासनगर: ४ वर्षांचा रूद्र लघुशंकेला गेला अन् पावसाने घात केला

जिल्ह्यात सर्वाधिक  211  मी मी पावसाची नोंद मोखाड्यात झाली आहे. या अतिवृष्टीमुळे अनेक गावपाड्यांतील लावणी केलेले खरीपाचे भात, नागली आणि वरई चे ऊभे पीक वाहुन गेले आहे. तर काही भागात शेतांचे बांध फुटल्याने ऊभे पीक माती, दगड, गोट्याखाली दडपले गेले आहे. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील बहुतांश गावपाड्यांचा विद्युतपुरवठा खंडित झाला आहे. रस्ते वाहतुक बंद झाल्याने चाकरमाण्यांचे हाल झाले आहे.

हेही वाचा: कोरोनाचा बालकांच्या मानसिकतेवर 'असा' झाला परिणाम, जाणून घ्या सविस्तर

दरड कोसळलेल्या वाडा-खोडाळा मार्गावर स्थानिकांच्या मदतीने, रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला ही कळविण्यात आले आहे. शेतीच्या नुकसानीची माहिती गोळा केली जात आहे. त्यासाठी ग्रामस्थ, पोलीस पाटील आणि तलाठी यांनी काम सुरू केले आहे - वैभव पवार, तहसीलदार, मोखाडा.

loading image