मिरा-भाईंदर मेट्रो कामाचा श्री गणेशा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

भाईंदर ः मिरा-भाईंदर मेट्रोच्या कामास शहरात सुरुवात झाली आहे. ‘जे. कुमार’ या कंपनीला मेट्रोचे काम देण्यात आले असून त्यांच्याकडून मेट्रोच्या प्रस्तावित मार्गावर काम सुरू करण्यात आले आहे. मेट्रोच्या जागेत बॅरिकेट्‌स लावून भू-तांत्रिक तपासणीचे कामही सुरू झाले आहे, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.   

मिरा-भाईंदर मेट्रोचे काम जागेवर सुरू व्हावे, यासाठी शिवसेनेने पाठपुरावा करतानाच शहरात अभिनव आणि लक्षवेधी आंदोलनेही केली होती. यंदा १५ ऑगस्टपूर्वी मिरा-भाईंदर मेट्रोचे काम प्रत्यक्षात जागेवर सुरू करावे, अशी विनंती सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली होती.

एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी हे काम ऑगस्टअखेरीस सुरू करण्याचे आश्‍वासन त्यांना दिले होते. त्यानुसार मेट्रोच्या स्थापत्य कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जे. कुमार या कंपनीला कामही देण्यात आले आहे. मेट्रो प्रकल्पाचा पूर्ण खर्च सहा हजार ६०७ कोटी इतका आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून जागेवर बॅरिकेट्‌स लावण्यात आले आहेत. मार्गावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.

काशीमिरा नाका, झंकार कंपनी स्टेशन, साईबाबानगर स्टेशन, दीपक हॉस्पिटल येथे काम सुरू आहे. मेट्रोच्या जागेवर तीन ठिकाणी भू-तांत्रिक तपासणीही (जिओटेक्‍निकल इन्व्हेस्टिगेशन) सुरू झाली आहे. आता खऱ्या अर्थाने कामाचा श्री गणेशा झाला आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.

११ किमीचा मेट्रो मार्ग, आठ स्टेशन
मिरा-भाईंदर मेट्रोच्या मार्गात एकूण आठ स्टेशन असणार आहेत. हा मार्ग जवळपास ११.१९२ किमीचा असणार आहे. त्यात दहिसर, पांडुरंग वाडी, मिरा गाव, काशिगाव, साईबाबा नगर, मेडतिया नगर, शहीद भगतसिंग गार्डन, सुभाषचंद्र बोस स्टेडियम ही एकूण आठ स्टेशने असणार आहेत. या मेट्रो मार्गासाठी भाईंदर पाडा आणि दहिसर येथे कार डेपो प्रस्तावित करण्यात आला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beginning of Mira-Bhayander Metro work उच्चारण करण्यास शिका Google भाषांतर मध्ये उघडा फीडबॅक वेब परिणाम Google भाषांतर https://translate.google.com › ... Google ची विनामूल्य सेवा शब्द, वाक्यांश आणि वेब पृष्ठांचे ... आणि 100 पेक्षा अधिक इतर भाषांमध्ये त