पाम बीच मार्ग लखलखणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

बेलापूर - पाम बीच  मार्गावर २० वर्षांपूर्वी बसवण्यात आलेले पथदिव्याचे खांब धोकादायक बनले आहेत. काही खांब अपघातामुळे तुटले आहेत. त्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी अंधार असल्यामुळे अपघातांची शक्‍यता वाढल्याने महापालिकेने ते बदलून नवे खांब बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा प्रस्ताव तयार केला असून तो मंजुरीसाठी स्थायी समितीकडे सादर केला आहे. त्याला मान्यता मिळताच या रस्त्यावरील खांब बदलण्याचे काम सुरू होणार आहे.

सीबीडी बेलापूर ते वाशी यामधील अंतर आणि सायन-पनवेल महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी सिडकोने २००० मध्ये देखणा पाम बीच रस्ता बांधला. वेळ आणि इंधनाच्या बचतीबरोबर वाहतूक कोंडीमुक्त असल्याने नागरिकांच्या आणि वाहनचालकांच्या तो पसंतीला उतरला. या मार्गावरून सीबीडी बेलापूर, सीवूडस्‌, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, वाशी आणि शहराच्या इतर भागात जाणे सोईस्कर झाले. २००७ मध्ये सिडकोने हा रस्ता नवी मुंबई पालिकेकडे हस्तांतरित केला. तेव्हापासून पालिकेने या रस्त्याच्या दुरुस्तीशिवाय इतर कोणतेच काम केले नव्हते. गेल्या वर्षी पावसाळ्यात या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. अनेक ठिकाणी तो खडबडीत झाला होता. त्यामुळे मायक्रोसर्फेसिंगने त्याचे डांबरीकरण केले आहे. 

Web Title: belapur news Pam beach street lamp