उरण फाटा पुलाखाली गुडघाभर पाणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

बेलापूर - दोनतीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे नेरूळ येथील उरण फाटा उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. येथील पदपथ गटारात कोसळला असल्याने पादचाऱ्यांना पाण्यातून जावे लागत आहे.

सायन-पनवेल महामार्गावरील उरण फाटा येथील उड्डाणपुलावरील निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणामुळे येथे अनेक अपघात झाले आहेत. ते टाळण्यासाठी नेरूळ पोलिसांनी कमी वेगाने वाहने चालविण्याच्या आणि शक्‍य असल्यास उड्डाणपुलाच्या खालून जाण्याच्या सूचनांचा फलक लावला आहे. उड्डाणपुलावरील रस्ता योग्य नसल्याने अनेक वाहनचालक उड्डाणपुलाखालील मार्गाचा वापर करीत आहेत. पावसामुळे या उड्डाणपुलाखाली गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे पुलावर निसरडा रस्ता आणि खाली पाणी त्यामुळे जायचे कोठून असा प्रश्‍न वाहनचालकांना पडला आहे. पावसामुळे येथील पावसाळी नाल्यावरील स्लॅब कोसळला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांचीही गैरसोय होत आहे.

Web Title: belapur news rain