ऐरोलीत शिवसेनेला खिंडार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

बेलापूर - ऐरोली शिवसेनेला खिंडार पडले आहे. प्रभाग क्रमांक १० मधील शिवसेना शाखाप्रमुख आणि उप शाखाप्रमुखांसह शेकडो शिवसैनिकांनी माजी मंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. १८) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी महापौर सागर नाईक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, युवक जिल्हाध्यक्ष सूरज पाटील, नगरसेविका शशिकला सुतार या वेळी उपस्थित होते. 

राष्ट्रवादी काँग्रेस नवी मुंबई शहराच्या विकासासाठी काम करत आहे. त्यामुळे या पक्षात प्रवेश केल्याचे व माजी मंत्री नाईक यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाईक यांचे नवी मुंबईला लाभलेले दूरदृष्टीच्या विचारांचे नेतृत्व, माजी खासदार संजीव नाईक आणि आमदार संदीप नाईक यांच्या कार्य तत्परतेने प्रभावित होऊन शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याचे शाखाप्रमुख विनायक सुदाम साळवे यांनी सांगितले. २०१९ पर्यंत नवी मुंबई राष्ट्रवादीमय होईल, असा विश्‍वास सुतार यांनी व्यक्त केला.

Web Title: belapur news shiv sena