भाजी मंडई पालिकेनेच पाडली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

बेलापूर - नेरूळ सेक्‍टर ६ मधील दत्तगुरु सोसायटीच्या शेजारी बांधलेली भाजी मंडई अखेर महापालिकेनेच पाडली. त्यामुळे या अतिधोकादायक सोसायटीच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. दत्तगुरु सोसायटीला पुनर्बांधणीसाठी वाढीव चटईक्षेत्र मिळण्याच्या अनुषंगाने रस्ता रुंदीकरणाच्या प्रस्तावाला पालिकेच्या महासभेने मंजुरी दिली होती. त्यानुसार पालिकेने ही कारवाई केली. विशेष म्हणजे ही मंडई पाडण्यासाठी सिडकोनेही पालिकेला नोटीस बजावली होती.

दत्तगुरु सोसायटीमध्ये ‘ए’ टाईपच्या दोन इमारती असून १३६ सदनिका आहेत. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे येथील इमारतींची दुरवस्था झाली. २००७ पासून पालिकेने या सोसायटीला धोकादायक म्हणून घोषित केले होते. चार वर्षांपासून ती राहण्यास आयोग्य ठरवत अतिधोकादायक म्हणून घोषित केली आहे. सिडकोने या सोसायटीच्या पुनर्बांधणीसाठी शेजारील ओपन स्पेसचा भूखंड दिला आहे; परंतु ओपन स्पेससाठी ही राखीव जागा असल्याने पालिकेने परवानगी दिली नव्हती. त्यानंतर सिडकोने या सोसायटीला पुनर्बांधणीसाठी दुसऱ्या बाजूला मार्केट आणि सर्व्हिस शॉपसाठी राखीव ठेलेला भूखंड देऊ केला होता; परंतु सिडकोकडून जागा हस्तांतरित न करताच तेथे पालिकेने २०१५ मध्ये भाजी मंडई बांधली होती. सिडकोने ती अनधिकृत ठरवून पाडण्याबाबत पालिकेला नोटीस बजावली होती. धोकादायक इमारतीमध्ये जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा विषय महत्त्वाचा असताना पालिकेकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप नगरसेवक सुरज पाटील यांनी केला होता.

शिवसेनेची स्वाक्षरी मोहीम 
नेरूळ सेक्‍टर सहा आणि सारसोळे गावासाठी भाजी मंडई नसल्याने हे मार्केट तोडू नये यासाठी शिवसेना पदाधिकारी प्रल्हाद पाटील यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. मंडई सुरू झाल्यास फेरीवाल्यांची समस्या काही प्रमाणात निकाली निघणार होती. त्यामुळे ही मंडई पाडू नये यासाठी स्वाक्षरी मोहीमही राबवण्यात आली होती.

Web Title: belapur news vegetable market destroyed by the corporation