चव्हाण मैदानाला ‘अच्छे दिन’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

बेलापूर - नवी मुंबई महापालिकेने फिफाच्या सराव सामन्यांसाठी नेरूळ सेक्‍टर १९ येथे तयार केलेल्या यशवंतराव चव्हाण मैदानाचे फुटबॉलच्या सरावासाठी मे महिन्याचे बुकिंग फुल झाले आहे. त्यामुळे या मैदानाला अच्छे दिन आले आहेत. लाखोंचा खर्च करून तयार केलेले हे मैदान अनेक महिने पडून होते. त्यामुळे महापालिकेवर सर्वस्तरातून टीका केली जात होती; परंतु या मैदानाच्या वापराच्या अटी आणि दर निश्‍चित केल्यानंतर त्याचे मोठ्या प्रमाणात बुकिंग केले जात आहे. 

नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर गेल्यावर्षी झालेल्या १७ वर्षांखालील फिफा ज्युनियर वर्ल्डकपच्या सराव सामन्यांसाठी नवी मुंबई महापालिकेने नेरूळ सेक्‍टर १९ मधील यशवंतराव चव्हाण मैदान तयार केले होते. आंतरराष्ट्रीय खेळाडू तेथे खेळणार असल्याने त्या दर्जाच्या सुविधा तेथे निर्माण केल्या होत्या. मैदानात हिरवळ, स्पिंकलर, खेळाडूंसाठी रेस्ट रूम, प्रसाधनगृह, चेंजिंग रूम, हायमास्ट आदी कामे केली होती. फिफाचे सामने संपल्यानंतरही हे मैदान इतर खेळाडूंसाठी खुले केले नव्हते; परंतु त्याच्या देखभालीवर मोठा खर्च केला जात होता. त्यामुळे पालिकेसाठी ते पांढरा हत्ती बनले होते; मात्र पालिका प्रशासनाने जानेवारीत या मैदानाच्या वापराचे दर आणि अटी निश्‍चित करून महासभेची मंजुरी मिळवली होती. त्यानंतर काही खासगी संस्थांनी या मैदानावर फुटबॉल सरावाचे सामने सुरू केले होते. मे महिन्यात सराव सामन्यांसाठी नवी मुंबईतील फुटबॉल स्कूल ऑफ इंडिया या कोचिंग क्‍लबने शहरातील शाळांमधील खेळाडूंच्या फुटबॉल सराव सामन्यांसाठी या मैदानाचे बुकिंग केले आहे. सकाळी २ आणि सायंकाळी २ तास येथे फुटबॉलचे सामने होणार आहेत. खासगी संस्थेच्या वतीने हे सामने खेळवले जात असल्याने या सामन्यांसाठी तासाला दोन हजार ५०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून ओस पडलेल्या फुटबॉलच्या या मैदानाला अच्छे दिन आले आहेत.

स्थानिक खेळाडूंची अडचण 
यशवंतराव चव्हाण मैदानात परिसरातील स्थानिक खेळाडू अनेक वर्षांपासून क्रिकेट खेळतात. या मैदानाचा काही भाग फुटबॉलसाठी तयार केला आहे. फुटबॉलसाठी मैदान तयार करताना स्थानिकांनी विरोध केला होता. त्या वेळी पालिका प्रशासनाने फुटबॉल सामन्यानंतर संपूर्ण मैदान क्रिकेटसाठी वापरण्यास देणार असल्याचे सांगितले होते; परंतु तसे झाले नाही. मैदानाचा काही भाग फुटबॉल मैदानाने व्यापला असल्याने उर्वरित मैदानात क्रिकेट खेळताना खेळाडूंना अडचणी येत आहेत.

Web Title: belapur news yashwantrao Chavan ground Nerul Sector 19