बेलापूरची वाहतूक कोंडी फुटणार! ...हे आहे कारण

बेलापूरची वाहतूक कोंडी फुटणार! ...हे आहे कारण
बेलापूरची वाहतूक कोंडी फुटणार! ...हे आहे कारण

नवी मुंबई : शहरातील रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या वाहनांसाठी लवकरच महापालिकेतर्फे बहुमजली अत्याधुनिक वाहनतळ उभारले जाणार आहे. चार मजली इमारतीमध्ये तब्बल ८०० पेक्षा जास्त वाहने उभी करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. बहुमजली वाहनतळ उभारण्यासाठी महापालिकेतर्फे ३० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. प्रशासनातर्फे हा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. 

करीनाचे साडीतले हे फोटो पाहिलेत का? यावर आहे ‘हटके’ काही

https://www.esakal.com/mumbai/unique-saree-style-icon-and-leading-actress-kareena-kapoor-bebo-243182

नवी मुंबईतील बेलापूर हे सर्वाधिक वर्दळ असणारे शहर आहे. या शहरात सरकारी कार्यालये, राष्ट्रीयीकृत बॅंकांची मुख्यालये, पोलिस आयुक्तालय, आरबीआय बॅंक मुख्यालय, महापालिका मुख्यालय आदी प्रकारच्या महत्त्वाच्या कार्यालयांसहीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यालये आहेत. तसेच रहिवाशी इमारतींचीही मोठी संख्या असल्यामुळे चार चाकी, दुचाकी वाहनांची भरमसाठ संख्या वाढली आहे. या वाहनांसाठी वाहनतळ नसल्यामुळे अनेक वाहनचालक मिळेल त्याठिकाणी व जागा दिसेल तिकडे वाहने उभी करतात. बेलापूरमधील सेक्‍टर २, ४, सेक्‍टर ८, सेक्‍टर ११, सेक्‍टर १५ हे विभाग नेहमी गजबजलेले असतात. रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. संध्याकाळच्या सुमारास सेक्‍टर ११ चा पामबीच मार्गावर किल्ले गावठाणपासून लागलेल्या वाहनांच्या रांगा के-स्टार हॉटेलपर्यंत आलेल्या असतात. अर्बन हाट चौकापासून जुन्या महापालिका मुख्यालयापर्यंत वाहतूक कोंडी झालेली असते; परंतु यावर तोडगा काढण्यासाठी पालिकेतर्फे वाहनतळ उभारले जाणार आहे. 

असे असेल वाहनतळ! 
महापालिकेतर्फे सेक्‍टर १५ येथे भूखंड क्रमांक ३९ वर चार मजली वाहनतळ उभारणार आहे. तळ मजल्यावर १२१ दुचाकी व ८७ चारचाकी वाहने, चार रॅम्पसह कार्यालय व स्वच्छतागृह असणार आहे. पहिल्या ते चौथ्या मजल्यावर एकूण प्रत्येकी ८० असे एकूण ४०७ चारचाकी व १२१ दुचाकी वाहनांच्या वाहनतळाची व्यवस्था केली जाणार आहे. या कामाचे नकाशे, आराखडे सोपान प्रभू या वास्तुविशारदांमार्फत तयार केले आहेत. बहुमजली वाहनतळ उभारण्यासाठी पालिकेतर्फे ३० कोटी १६ लाख रुपये खर्च केला जाणार आहे. या वाहनतळामुळे बेलापूरमधील वाहतूक कोंडी सुटणार असल्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com