K-OK bell on bogus document crime बनावट कागदपत्रांद्वारे जामीन | eSakal

बनावट कागदपत्रांद्वारे जामीन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

ठाणे - बनावट कागदपत्रे तयार करून आरोपींना न्यायालयात जामीन मिळवून देणाऱ्या सहा जणांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. उपायुक्त दीपक देवराज यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांच्याकडून 45 रबरी स्टॅम्प, 51 बनावट रेशनिंग कार्ड, 318 ग्रामपंचायतींच्या करपावत्या, बनावट आधार कार्ड जप्त केले.

या टोळीने 125 हून अधिक आरोपींना कल्याण, उल्हासनगर आणि ठाणे न्यायालयात बनावट कागदपत्रांद्वारे जामीन दिला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याद्वारे न्यायालयाची या आरोपींनी फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. न्यायालयामध्ये काही जण बनावट कागदपत्रे तयार करून आरोपींना जामीन करून देत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखा युनिट 4 ला मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी सापळा लावून सहा जणांना अटक केली.

आरोपी बनावट जामीनदाराला पैशाचे प्रलोभन दाखवून त्याचे बनावट रेशन कार्ड तयार करत असत. त्यावर बनावट शिक्के, ग्रामसेवकाची खोटी सही करून जामीन मिळवून देत होते.

Web Title: bell on bogus document crime