समीर भुजबळांचीही जामिनासाठी मागणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

मुंबई - दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात नुकताच जामीन मंजूर झालेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याप्रमाणेच मलाही जामीन मंजूर करावा, अशी मागणी मंगळवारी माजी खासदार आरोपी समीर भुजबळ यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात केली.

सर्वोच्च न्यायालयाने मनी लॉण्डरिंग प्रतिबंधक कायद्याचे कलम 45 (1) रद्दबातल केले आहे. त्यामुळे भुजबळ यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. याच प्रकरणात आरोपी समीर भुजबळ यांनीही याच तरतुदीच्या आधारावर अंतरिम जामीन मंजूर करण्याची मागणी केली आहे. सुटीकालीन न्या. व्ही. एल. अचलिया यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी यावर सुनावणी झाली. याबाबत सविस्तर सुनावणी घेण्यात येईल, असे न्या. अचलिया यांनी स्पष्ट केले. सुनावणी 21 मेपर्यंत तहकूब केली.

Web Title: bell demand by sameer bhujbal