जेष्ठ अभिनेत्री अवा मुखर्जी यांचे निधन

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 जानेवारी 2018

मुंबई - देवदास चित्रपटात शाहरुखच्या आजीची भूमिका साकारणाऱ्या अवा मुखर्जी (88) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. चित्रपटांसोबतच त्यांनी जाहिराती आणि छोट्या पडद्यावरही मोलाचे योगदान दिले.

अवा मुखर्जी यांनी 1963मध्ये एका बंगाली चित्रपटातून अभिनयातील कारकिर्दीला सुरुवात केली. तारु मुखर्जी दिग्दर्शित 'राम ढाका' या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 

2009मध्ये अवा यांची मुलगी रोमिला मुखर्जी दिग्दर्शित 'डिटेक्टिव नानी' या चित्रपटात त्यांची मुख्य भूमिका होती.

बॉलिवूडच्या या 'डिटेक्टिव नानी'ला सोशल मीडियावरही अनेक कलाकारांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Web Title: Beloved screen grandmother Ava Mukherjee passes away