'बेस्ट'चा मुंबईकरांसाठी एकदम बेस्ट निर्णय,  ग्राहकांना दिलासा

electricity bill
electricity bill

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात प्रत्यक्ष वीजमीटर मोजणी न करता बेस्टनं सरासरी अंदाजे वीजबिल आकारल्यानं मुंबई शहर आणि उपनगरात वाढलेल्या वीज ग्राहक चांगलेच वैतागले आहेत. वीज बिलाचा आकडा बघून ग्राहकांना शॉक बसला आहे. अशातच बेस्टनं वीज बिलापोटी आकारलेली अधिकची रक्कम व्याजासह परत करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान मुंबई शहरात वीज पुरवठा करणारी कंपनी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमा (बेस्ट) ने आपल्या ग्राहकांना ३ हप्त्यांमध्ये वीज बिल भरण्याची मुभा दिली आहे. 

सरासरीपेक्षा जास्त बिले आलेल्यांसह ज्यांना बिलाची सर्व रक्कम एकदम भरता येणं शक्य नसेल  त्यांनाही तीन महिने मुदतवाढ दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात बेस्टच्या विद्युत विभागानं वीजबिलासाठी मार्च महिन्यातील बिलाचा आधार घेतला. या महिन्याच्या बिलाच्या आधारावरच नंतर एप्रिल, मे महिन्यातील बिलं काढली गेली. दरवर्षी उन्हाळ्यातील एप्रिल, मे, जूनमध्ये विजेचा वापर वाढत जातो. यावर्षी लॉकडाऊन असल्यामुळे घरगुती विजेच्या वापरात आणखीनच भर पडली आहे. लॉकडाऊनमध्ये वीजेच्या मीटरचं रीडिंग न झाल्यानं मार्चच्या बिलानुसार सरासरी अंदाजे बिल काढली गेली. 

याबाबत बेस्टनं पत्रक काढलं आहे. या पत्रकात स्पष्ट केलं आहे की, १९ मे पासून उपक्रमाच्या औद्योगिक आणि वाणिज्य वीज ग्राहकांना त्यांच्या अंदाजित वापराच्या १० टक्के वापरावर आधारीत वीजदेयक सादर करण्यात आलेली आहेत. औद्यागिक आणि वाणिज्यीक वीज ग्राहकांना स्थिर आकारांवर ३ महिन्यांकरीता अधिस्थगन करण्याची मुभा दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व ग्राहकांना देण्यात आलेली वीज देयके ही मार्च महिन्याच्या विजेच्या वापराच्या आधारे देण्यात आलेली आहेत. एप्रिल, मे आणि जून या महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे विजेचा वापर जास्त असतो. लॉकडाऊनच्या काळात बहुतेक नागरिक घरीच असल्याने अनेक प्रकरणांमध्ये वीज वापरात वाढ झालेली आहे.

पत्रकात बेस्टनं काय म्हटलं ? 

प्रत्येक वीजमापक वाचन घेतल्यानंतर ज्या वीजग्राहकांना जास्त रकमेची अंदाजित देयके सादर करण्यात आली होती. अशा वीज ग्राहकांना त्या रकमेचा व्याजासहित परतावा त्यांच्या अकाऊंटमध्ये देण्यात येईल. ज्या वीज ग्राहकांचे अंदाजित देयक कमी आलं आहे. अशा वीज ग्राहकांना प्रत्यक्ष वीज वापराच्या आधारे देय रक्कम आकारण्यात येईल. टप्पानिहाय लाभ देण्यासाठी संपूर्ण वापरलेले युनिट महिनावारी विभागले जातील. प्रलंबित प्रदानाबाबतचे आकार आणि थकबाकीवरील व्याज यांची परिगणना केवळ प्रत्यक्ष वीज वापराच्या आधारे करण्यात येईल आणि वसूल करण्यात आलेली अतिरिक्त रक्कम वीज ग्राहकांना त्यांच्या वीज देयकांमध्ये परत करण्यात येईल. 

१५ जून २०२० पासून रेड झोन व्यतिरिक्त इतर भागातील वीज ग्राहकांना त्यांच्या प्रत्यक्ष वीज वापरावर आधारीत भागनिहाय देयके देण्याकरीता बेस्ट उपक्रमाने मीटरवाचन करण्यास सुरूवात केली आहे. जेणेकरून प्रत्यक्ष वीजवापरावर आधारीत देयके लवकरात लवकर वीज ग्राहकांना देता येतील. धोरणात्मक बाब म्हणून वीज ग्राहकांची गैरसोय टाळण्याकरीता लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अदत्त प्रदानामुळे विद्युतपुरवठा खंडीत करण्यात आलेला नाही. ज्या वीज ग्राहकांना मार्च ते मे या कालावधीकरीता सरासरी तत्त्वावर दिलेल्या देयकांपेक्षा दुप्पट वा अधिक देय रक्कम आली असेल, अशा वीज ग्राहकांना व्याजासह ३ मासिक सुलभ हप्त्यांमध्ये देयक प्रदान करण्याचा पर्याय देण्यात येईल.

Best is the best decision for Mumbaikars, a relief to the customers

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com