विक्रोळीत बेस्ट बसचा भीषण अपघात, काही प्रवासी गंभीर जखमी

जीवन तांबे
Saturday, 17 October 2020

मुंबईतील विक्रोळी पूर्वद्रुतगती मार्गावर बेस्ट बसचा अपघात झालाय. या अपघातावेळी बसमध्ये एकूण 20 ते 25 प्रवासी असल्याची माहिती समोर येतेय.

मुंबई, चेंबूर  : मुंबईतील विक्रोळी पूर्वद्रुतगती मार्गावर बेस्ट बसचा अपघात झालाय. या अपघातावेळी बसमध्ये एकूण 20 ते 25 प्रवासी असल्याची माहिती समोर येतेय. अपघातानंतर बसमधील काही प्रवास गंभीर जखमी झाल्याची देखील माहिती आता समोर येतेय. बेस्ट बस अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना जवळील राजावाडी आणि विक्रोळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

महत्त्वाची बातमी : मुलुंडमधील अ‍ॅपेक्स हॉस्पिटलचं होणार ऑडिट, आग प्रकरणानंतर समोर येणाऱ्या माहितीच्या आधारे चौकशी

भांडुप डेपो येथून बस क्रमांक 27 ही बस भांडुप ते वरळी या मार्गे जात असताना  या बसमध्ये एकूण 20 ते 25 प्रवासी होते. याच दरम्यान विक्रोळी पूर्वद्रुतगती मार्गावरील विक्रोळी उड्डाणपुलाजवळील घाटकोपरच्या दिशेने जाताना बसच्या समोर अचानकपणे मोटरसायकल आल्याने त्या मोटरसायकल चालकास वाचविण्याचा बसचा प्रयत्न होता. यावेळी बेस्ट बस चालकाचा स्टेरींगवरून ताबा सुटल्यामुळे विक्रोळी येथील उड्डाणपुलालगत असलेल्या फुटपाथवर बसने धडक दिल्याने हा भीषण अपघात झालाय.

महत्त्वाची बातमी : भाजपच्या आशिष शेलारांकडून उद्धव ठाकरेंच्या सुपुत्राच्या पाठीवर कौतुकाची थाप; म्हणालेत, "काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे! ग्रेट!"

या अपघातात बस चालकांना दुखापत झाली आसून त्यांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस पोहोचले असून सदर घटनेचा सविस्तर तपास सुरु आहे.

( संपादन - सुमित बागुल )

best bus accident on eastern highway of mumbai many injured in accident

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: best bus accident on eastern highway of mumbai many injured in accident