मुंबईकरांच्या मानेवर बेस्ट बस संपाची तलवार टांगतीच  

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

लेखी आश्‍वासन मिळेपर्यंत संप मागे न घेण्याची बेस्ट कृती समितीने घेतली आहे.त्यामुळे मुंबईवर रक्षाबंधनाच्या सणाला संपाची टांगती तलवार आहे.रविवार मध्यरात्री पासून सुरु होणाऱ्या या बेमुदत संपात 36 हजार कामगार कर्मचारी सहभागी होणार आहेत. 

मुंबई: लेखी आश्‍वासन मिळेपर्यंत संप मागे न घेण्याची बेस्ट कृती समितीने घेतली आहे.त्यामुळे मुंबईवर रक्षाबंधनाच्या सणाला संपाची टांगती तलवार आहे.रविवार मध्यरात्री पासून सुरु होणाऱ्या या बेमुदत संपात 36 हजार कामगार कर्मचारी सहभागी होणार आहेत. 

वेतन वेळेवर मिळावे तसेच महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा मिळाव्यात यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी आज मध्यरात्री पासून संपाची हाक दिली आहे. हा संप टळावा म्हणून महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी 10 तारखे पर्यंत वेतन देण्याचे आश्‍वासन दिले.मात्र,आयुक्तांवर आम्हाला विश्‍वास नाही.त्यामुळे लेखी आश्‍वासन मिळे पर्यंत संपाचा निर्णय कायम असल्याचे बेस्ट कामगार कृती समितीचे शशांक राव यांनी सांगितले. 

बेस्ट बस मधून दररोज 35 लाख प्रवासी प्रवास करतात.तसेच सणांच्या दिवशात या प्रवाशांची संख्या वाढते.मात्र,सोमवारी रक्षाबंधनच्या सणाच्या दिवशीच कर्मचारी संपावर जाणार असल्याने मुंबई ठप्प पडण्याची शक्‍यता आहे.

Web Title: best bus protest mumbai esakal news