'बेस्ट'चे भाडे पाच रुपये करा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

'बेस्ट'चे भाडे सध्या 10 रुपये आहे; ते कमी करून पाच रुपये करा. तिकीटदर कमी केल्याचा अहवाल तीन महिन्यांत सादर केल्यानंतरच "बेस्ट'ला महापालिकेकडून अनुदान मिळेल; अन्यथा पुढील अनुदान मिळणार नाही, अशी जाचक अट महापालिकेने घातली आहे.

मुंबई - 'बेस्ट'चे भाडे सध्या 10 रुपये आहे; ते कमी करून पाच रुपये करा. तिकीटदर कमी केल्याचा अहवाल तीन महिन्यांत सादर केल्यानंतरच "बेस्ट'ला महापालिकेकडून अनुदान मिळेल; अन्यथा पुढील अनुदान मिळणार नाही, अशी जाचक अट महापालिकेने घातली आहे.

त्यामुळे "बेस्ट'पुढे भाडे कमी करण्याचा नवा पेच निर्माण झाला आहे.ॉ
"बेस्ट'च्या ताफ्यात नव्या 450 खासगी बस दाखल होणार आहेत. या गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यास "बेस्ट'मधील मान्यताप्राप्त कामगार संघटनेने मान्यता दिली आहे. त्यानंतर बेस्ट प्रशासन आणि महापालिका यांच्यात सामंजस्य करार झाला. या करारापोटी 600 कोटी रुपये "बेस्ट'ला देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीत मंजुरीसाठी आला आहे.

सध्या बेस्टचे किमान भाडे 10 रुपये आहे; ते कमी करून पाच रुपये करावे. त्याची त्वरित कार्यवाही करून तीन महिन्यांत अहवाल सादर करावा. तसे न केल्यास पालिकेकडूून अनुदानाची रक्कम मिळणार नाही, असे महापालिकेने म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Best Bus Rent Issue Municipal