बेस्ट होणार अधिक गतिमान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

मुंबई - बेस्टचे डिजिटायजेशन करण्याचा निर्धार ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात व्यक्त केला आहे. स्काडा पद्धत, वितरण स्वयंसंचन प्रणाली, स्वयंचलित भाडेवसुली, अद्ययावत संगणक प्रणाली, कनेक्‍शन व्यवस्थापन पद्धत यामुळे विद्युत, तसेच परिवहन विभाग अधिक गतिमान करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.

इंटेलिजंट ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. बेस्टमधील विविध विभागांचे एकत्रीकरणही लवकरच केले जाणार असल्याची माहिती डॉ. बागडे यांनी दिली. मुंबईत ३३ केव्ही नवीन उपकेंद्रे प्रस्तावित आहेत आणि त्यामुळे संचमांडणीच्या क्षमतेत ११६ एमव्हीए एवढी वाढ होईल. वीज वितरणजाळ्याच्या सक्षमीकरणामुळे विद्युत उपकेंद्रे कार्यान्वित होणार आहेत. स्काडा, वितरण स्वयंचलित प्रणाली, कलेक्‍शन व ग्राहक संबंध यांची व्यवस्थापन पद्धत या यंत्रणा एकत्र करण्यात येणार आहेत, अशी माहितीही डॉ. बागडे यांनी दिली.

एकत्रित तिकीट
उपनगरीय रेल्वे, मोनो, मेट्रो, बेस्ट, तसेच इतर सार्वजनिक वाहतूक प्राधिकरणांच्या वाहतूक साधनांमधून प्रवास करताना एकच प्रवास कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

मोबाईल ॲप
पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम प्रवाशांना बसचे ठिकाण, तसेच येणाऱ्या बसथांब्यांची माहिती उद्‌घोषणेद्वारे मिळेल. या सर्व माहितीसाठी मोबाईल ॲपही विकसित करण्यात येणार आहे.

२१,९०० एलईडी दिवे
‘बेस्ट’च्या मार्गांवर २१,९०० दिवे लावण्याची कार्यवाही गेल्या वर्षापासून सुरू झाली आहे. 

Web Title: Best Bus Service