बेस्टच्या बस आज आगारातून रस्त्यावर?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 जानेवारी 2019

मुंबई - बेस्ट कामगारांचा संप आठव्या दिवशीही सुरूच राहिला. संपाबाबत मंगळवारी कोणताही तोडगा निघू शकला नाही. उच्चस्तरीय समितीच्या अहवालावर उच्च न्यायालयातही तोडगा निघाला नाही. संपाबाबत उद्या (ता. १६) सकाळी ११ वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. 

टॅक्‍सी, रिक्षा आणि ओला-उबेरच्या वाढीव प्रवासभाड्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. संपाबाबत तातडीने निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांना दिले आहेत. त्यामुळे उद्या तोडगा निघण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. बेस्टच्या संपाचा मुद्दा न्यायालयात गेल्याने उच्च न्यायालयात तोडगा निघण्याची अपेक्षा कर्मचाऱ्यांना होती; मात्र तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार आणि कामानिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांची मोठी कोंडी झाली आहे. सरकारने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने आज अहवाल न्यायालयात सादर केला. त्यात संपावर तोडगा काढला, तर बेस्टवर ५५० कोटींचा बोजा वाढेल, असे म्हटले आहे.

Web Title: Best Bus Strike