आम्ही संप मिटवतो; तुम्ही निधी द्या!

मृणालिनी नानिवडेकर
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

मुंबई - बेस्ट संपामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचे हाल होत असल्याचे लक्षात आल्यानंतर संपाच्या तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांशी चर्चा केल्याचे सांगण्यात येते. या वेळी ठाकरे यांनी कामगारांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केल्याचे समजते.

भाजपच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, संपामुळे नागरिकांचे हाल होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर आम्ही पाहतो, असे उत्तर ठाकरे यांनी दिले. त्यामुळे त्यांच्यावर हा प्रश्‍न सोपविण्यात आला; मात्र कामगारांच्या मागण्या रास्त आहेत. त्यामुळे सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना केल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक उत्तर दिले असून, आवश्‍यक ती सर्व मदत करण्याचे आश्‍वासन दिले असल्याचेही सेनेतर्फे सांगण्यात आले.

Web Title: Best Bus Strike Fund Uddhav Thackeray Devendra Fadnavis Discussion