"बेस्ट' संपामुळे कष्टकऱ्यांची उपासमार

Best-Bus
Best-Bus

मुंबई - गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या संपाने माहुलमधील कष्टकऱ्यांना आपल्या मोलमजुरीवर पाणी सोडावे लागले; तर अनेक मुलांच्या शाळा बुडाल्या आहेत. आता हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यांची संपामुळे उपासमार सुरू झाली आहे.

"बेस्ट'चा संप सुरू असल्याने माहुलमधील विद्यार्थ्यांच्या शाळा बुडाल्या आहेत. अनेकांना नोकरीवर जाता आले नसल्याचे माहुल प्रकल्पग्रस्तांनी सांगितले. मुंबईतील प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन चेंबूरच्या माहुल येथे केले आहे. येथील नागरिकांना वाहतुकीसाठी "बेस्ट' बसशिवाय पर्याय नाही. ज्या अंतरासाठी बेस्ट बसने 22 रुपये खर्च होतात, त्याच अंतरासाठी रिक्षाने 150 ते 200 रुपये खर्च करावे लागत आहेत. हा भुर्दंड परवडणारा नसल्याने अनेकांनी घरीच राहणे पसंत केले आहे. संपामुळे विद्यार्थ्यांची शाळेला दांडी झाल्यानंतर आज परीक्षा असल्याने 300 रुपये खर्च करून जावे लागले, असे एका विद्यार्थ्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com