बेस्टचे तिकीट आता मोबाईल ऍपवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे, हजारच्या नोटा बाद करून "कॅशलेस' व्यवहार सुरू करण्याची घोषणा केली. या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. बेस्ट येत्या 10 डिसेंबरपासून "ई तिकिटिंग' सेवा सुरू करणार असल्याची घोषणा बेस्टचे महाव्यवस्थाक डॉ. जगदीश पाटील यांनी गुरुवारी (ता. 1) येथे केली.

बेस्टच्या डिजिटायझेशनचा भाग म्हणून रोखविरहित करण्याच्या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला. मोबाईलच्या माध्यमातून तिकीट मिळण्याची सुविधा बेस्टने प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहे. यापुढे प्रवाशांना त्यांची तिकिटे आणि बस पासांचे नूतनीकरण मोबाईलच्या रिडलर ऍपच्या साह्याने करता येईल. यासाठी बेस्टने "माय बेस्ट' ऍप तयार केले आहे. या ऍपच्या साह्याने सर्व बसमार्गांवर मोबाईल तिकीट उपलब्ध होईल. प्रवासी ऍपच्या साह्याने तिकीट घेऊन प्रवास करू शकतील. प्रवासी या ऍपवरील "डिजिटल पेमेंट सोल्युशनचा उपयोग करून तिकिटाचे आरक्षण करून बस वाहकाकडून इच्छित स्थळी जाण्यासाठी तिकीट घेऊन प्रवास करू शकतील, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली.

आता पासांचेही नूतनीकरण
सध्या प्रवाशांना उपलब्ध असलेल्या मासिक आणि त्रैमासिक बेस्ट बस पासाचे नूतनीकरणही मोबाईल ऍपच्या साह्याने करता येईल. बस गाड्या, बस थांबे आणि बस पास विक्री केंद्रांवर यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. विजेचे देयक भरण्यासाठी असलेल्या एसबीआय बडी, पेटीएम, फ्रीचार्ज या वॉलेट सुविधांचाही वापर करता येईल. बस पास नोंदणी आणि नूतनीकरणासाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डचाही वापर करता येईल, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली.

ऍपवरून देयकाची माहिती
बेस्ट आता स्वतःचे मोबाईल ऍप कार्यान्वित करणार आहे. या ऍपमधून वीज ग्राहकांना विजेची देयके तसेच देयकाची माहिती मिळू शकेल, असेही डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

Web Title: Best bus tickets on the mobile app