बेस्टला तारण्यासाठी मालमत्तांचे व्यावसायिकरण

विष्णू सोनवणे 
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

मुंबई - बेस्टची तूट वाढत चालल्याने आर्थिक संकट अधिकच गडद होत आहे. बेस्टला वाचवण्यासाठी मालमत्तांच्या व्यावसायिक वापराचा पर्याय प्रशासनाने निवडला आहे. बेस्टच्या मुंबईतील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी "प्राईस वॉटर ऍन्ड कुपर' या सल्लागारांची निवड केली आहे.

याबाबतचा अहवाल महिनाअखेरपर्यंत बेस्टला सादर होईल. त्यानंतर मालमत्तांच्या व्यावसायिक वापराचा आराखडा तयार केला जाणार आहे. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून 600 कोटी रुपयांच्या तुटीतून बाहेर पडण्यास मदत होईल, असा विश्‍वास प्रशासनाला वाटत आहे.

बेस्टच्या मालकीच्या मालमत्तेचा आता व्यावसायिक वापर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. बेस्टकडे आपल्या मालमत्तांचा तपशील नाही. हा डाटा तयार करण्याचे काम प्राईस वॉटर ऍन्ड कुपर या सल्लागारांकडे बेस्टने सोपविले आहे. कुर्ला, ओशिवरा, कांदरपाडा, वाकोला आगार आणि माहीम बसस्थानक ही बेस्टची पाच आगारे आणि बसस्थानकांचा व्यावसायिक वापरातून बेस्टला 600 कोटी रुपये मिळतील, असा विश्‍वास प्रशासनाला वाटत आहे. मुंबईतील बेस्टची आगारे, बसस्थानके, बस थांबा, विजेचे खांब, विद्युत केंद्रे, वीज वितरण केंद्रे, कार्यशाळा, बेस्टच्या वसाहती; तसेच इतर मालमत्तांची माहिती मिळविण्याचे काम हे सल्लागार करणार आहेत. या मालमत्तांपैकी कोणत्या मालमत्तांचा व्यावसायिक वापर करता येईल? कसा करता येईल? त्या मालमत्तांच्या सध्याच्या किंमती, व्यावसायिक वापरासाठी काढायच्या झाल्यास त्यापासून किती उत्पन्न मिळू शकेल? मालमत्तांचा विकास किती दिवसांत होणार? व त्यासाठीचा खर्च याबाबतचा संपूर्ण अहवाल डिसेंबरच्या अखेरीस बेस्ट प्रशासनाला सादर होणार आहे. प्रशासन हा अहवाल बेस्ट समितीत सादर करेल, अशी माहिती बेस्ट प्रशासनाने दिली.

एशियन डेव्हलपमेंट बॅंकेचे घेणार कर्ज
"प्राईस वॉटर ऍन्ड कुपर' या सल्लागाराचा अहवाल आल्यानंतर मालमत्तांचा विकास करण्यासाठी "एशियन डेव्हपलमेंट बॅंक' या आंतरराष्ट्रीय बॅंकेकडून कर्ज घेण्यात येणार आहे. व्यावसायिकीकरणासाठी बेस्ट स्वतः आगारांचा विकास करेल. त्यासाठी प्रत्येक आगारासाठी 100 कोटी रुपये लागणार असल्याची माहिती बेस्टच्या सूत्रांनी दिली.

Web Title: Best commercialization of the properties