मुंबई : पालिकेसह बेस्टची दिवाळी गोड

प्रत्येकी २० हजारांचे सानुग्रह अनुदान; २५० कोटींचा बोजा
bombay municipal corporation
bombay municipal corporationsakal

मुंबई : यंदा महापालिकेसह बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी दणदणीत होणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांना यंदा प्रत्येकी २० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. पुढील तीन वर्षे कर्मचाऱ्यांना अनुदान मिळणार आहे. त्यामुळे‍ पालिकेच्या तिजोरीवर यंदा २५० कोटींचा बोजा पडणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी १५ हजार ५०० आणि बेस्टच्या कर्मचाऱ्यांना १० हजार १०० रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळाले होते. कोविड काळात पालिकेसह बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून काम केले. त्यामुळे यंदा त्यांना २० हजार रुपयांचे अनुदान द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.

१.२७ लाख कर्मचाऱ्यांना लाभ

महापालिकेने जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदानाचा लाभ महापालिकेच्या ९५ हजार कर्मचाऱ्यांसह बेस्टच्या ३२ हजार अशा एकूण एक लाख २७ हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्याशिवाय पालिकेच्या प्राथमिक शिक्षकांनाही २० हजार रुपयांचे, तर माध्यमिक शाळा तसेच खासगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, अध्यापक विद्यालयातील कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com