BEST Electric Bus : बेस्ट उपक्रमाला अर्थसंकल्पातून संजीवनी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Best initiative revived from the budget BEST electric buses will 3700 mumbai

BEST Electric Bus : बेस्ट उपक्रमाला अर्थसंकल्पातून संजीवनी

मुंबई : बेस्ट परिवहन आणि विद्युत पुरवठा उपक्रमाला यंदाच्या वर्षातील अर्थसंकल्पात पुन्हा एकदा संजीवनी देण्यात आली आहे. वर्षी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात मुंबई महानगरपालिकेकडून ८०० कोटी रूपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १०० कोटी रूपयांची वाढ या अर्थसहाय्यात झालेली आहे. सातत्याने आर्थिक तोट्यातील बेस्ट उपक्रमाला या अर्थसंकल्पातून दिलासा मिळाला आहे.

बेस्ट विद्युत पुरवठा आणि परिवहन विभागाचा तोटा आता २ हजार ६०० कोटी रूपयांवर पोहचला आहे. त्यामुळे बेस्टला दैनंदिन ऑपरेशनसाठीही बॅंकांकडून कर्ज घ्यावे लागत आहे. या आर्थिक संकटातून दिलासा देण्यासाठी बेस्ट उपक्रमाला ८०० कोटी रूपयांचा आर्थिक आधार देण्यात आला आहे.

सार्वजनिक वाहतुकीचे महत्व लक्षात घेऊनच बेस्टचे दैनंदिन ऑपरेशन सुधारणेसाठी ही तरतूद करण्यात आली आहे. याआधी २०२२-२३ मध्ये बेस्ट उपक्रमास १३८२ कोटी आगाऊ रक्कम कर्जाच्या रूपात देण्यात आली आहे. त्यामध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी भागवण्यासाठी ४०० कोटी रूपये तर दैनंदिन ऑपरेशनसाठी ४५० कोटी रूपयांच्या रकमेचा समावेश आहे. राज्य सरकारच्या निर्णयसापेक्ष ही रक्कम कर्ज स्वरूपात देण्यात आली आहे

बेस्टला पालिकेकडून गेल्या काही वर्षांमध्ये ७०० कोटी रूपयांची आर्थिक तरतूद करण्यात येत होती. यंदाच्या वर्षी मात्र या रकमेमध्ये १०० कोटींची भर पडली आहे. बेस्टचा सध्याच्या बसेसचा ताफा पाहता वर्षअखेरीस हा ताफा ३ हजार ७०० कोटींवर पोहचवण्यात यचेईल. तर मार्च २०२४ साठीचे ७ हजार बसेसच्या ताफ्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. या सर्व बसेस इलेक्ट्रिक असल्याने मुंबईतील प्रदुषणासाठी या पुढाकाराची मदतच होईल, असा खुलासा पालिका आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी पत्रकार परिषदेत केला.